dussehra was celebrated in a traditional manner in nashik Sakal
नाशिक

कोरोनाचे संकट दूर होऊ दे! सीमोल्लंघनातून नाशिककरांचे भगवतीला साकडे

दत्ता जाधव

पंचवटी (नाशिक) : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला थोपविण्यात यश मिळत असल्याने काहीशा निर्धास्त झालेल्या नाशिककरांनी पारंपरिक पद्धतीने सीमोल्लंघन करत आई भगवतीला कोरोनारूपी संकट आता दूर होऊ दे, म्हणत साकडे घातले. भाविकांनी श्री कालिकादेवीसह ग्रामदैवत भद्रकाली, सांडव्यावरील देवी, कपालेश्‍वर, श्री काळारामासह अन्य मंदिरांत श्रद्धापूर्वक दर्शन घेत खऱ्या अर्थाने विजयाचे सीमोल्लंघन केले.


कोरोना उद्रेकामुळे गतवर्षी मंदिरांसह सर्वत्र लॉकडाउन होते. या काळात नागरिकांना घराबाहेर पडताच आले नव्हते. यंदा या परिस्थितीत मोठ्या प्रमाणावर सुधारणा झाल्याने सायंकाळनंतर सर्वच मंदिरांमध्ये सोने वाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी करत या चैतन्य पर्वाची अनुभूती घेतली. दसऱ्यामुळे बाजारातही मोठा उत्साह होता.

कालिकादेवी दर्शनासाठी गर्दी

नाशिककरांचे मोठे श्रद्धास्थान असलेल्या कालिकादेवीच्या दर्शनासाठी गत नऊ दिवसांच्या तुलनेत पहाटेपासून मोठी गर्दी उसळली होती. देवस्थानाकडून ऑनलाइन बुकिंगसह थर्मल स्कॅनिंग, सॅनिटायझेशन याबाबत विशेष दक्षता घेतली जात होती. दुपारी बाराला विश्‍वस्त व प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत शस्त्रपूजन झाले. राज्यातील रक्ताच्या तुटवड्याच्या पार्श्‍वभूमीवर ट्रस्टतर्फे झालेल्या पाचदिवसीय रक्तदान शिबिरातून शंभर बाटल्या रक्तसंकलन झाले. सीमोल्लंघनासाठी रात्री उशिरापर्यंत भाविकांची गर्दी उसळली होती.

सोने लुटण्यासाठी भाविकांची गर्दी

वणीच्या सप्तशृंगीचे प्रतिरूप समजल्या जाणाऱ्या गंगाघाटावरील सांडव्यावरील देवीदर्शनासाठी भाविकांची सकाळपासून गर्दी होती. त्यात महिला भाविकांचा वाटा मोठा होता. गर्दी टाळण्यासाठी या वर्षी मंदिरात उत्तरेकडून प्रवेश देण्यात आला होता. महिला व पुरुषांच्या स्वतंत्र रांगा करण्यात आल्या होत्या. भाविकांनी रस्त्यात वाहने उभी केल्याने आजही या भागात वाहतूक कोंडी झाली. ग्रामदैवत भद्रकाली देवी मंदिरातही सोने लुटण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. महिला भाविकांनी कोरोना संकट दूर होऊन संपन्नता दे, असे साकडे घातले.

खऱ्या अर्थाने सीमोल्लंघन करावे

पूर्वीच्या काळी राजे-महाराजे या दिवशी देवीचा आशिर्वाद घेऊन सीमोल्लंघनाला म्हणजे युद्धाला निघत. आधुनिक काळात अज्ञानाचा नाश ज्ञानाने, अंधाराचा नाश उजेडाने करावा, अशुभ गोष्टींचा त्याग करत अज्ञानातून बाहेर पडत ज्ञानार्जन करावे, तरुणांनी व्यसनाधीनता सोडत खऱ्या अर्थाने सीमोल्लंघन करावे, असे आवाहन धर्म व ज्योतिष अभ्यासक पंडित नरेंद्र धारणे यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Chairman Election : 'वडिलांच्या कष्टाची परतफेड म्हणून मुलाला अध्यक्ष करा'; शशिकांत पाटील यांच्यासाठी चुयेकरांच्या स्मारकासमोर ग्रामस्थांचे साकडे

Sangli Farmer Loan Waiver : 30 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर 204 कोटींची कर्जमाफीची रक्कम जमा; चौथ्या यादीत 8 हजार जणांचा समावेश, 'आधार' प्रमाणिकरण पूर्ण करणे गरजेचे!

‘बिखरेगा जलवा’! म्हणत श्रद्धा कपूरने 'ईठा' सिनेमातील क्लिप केली शेअर! नाना पाटेकरांची सुद्धा महत्त्वाची भूमिका?

US Fed Rate: अमेरिकन फेडचा व्याजदराबाबत निर्णय! शेअर बाजारापासून सोन्या-चांदीपर्यंत काय परिणाम होणार?

Latest Marathi News Update : कुणाल मार्केट इमारतीत भीषण आग; 17 दुचाकी, 4 चारचाकी जळून खाक

SCROLL FOR NEXT