द्वारकातील अतिक्रमित
जागेप्रकरणी २६ ला सुनावणी
सकाळ वृत्तसेवा
जुने नाशिक, ता. १८ : नाशिक पूर्व विभागातील जुना देवळाली नाका (द्वारका) परिसरातील अंतिम भूखंड क्रमांक २८२ महापालिकेच्या जागेचा व्यावसायिक वापर सुरू आहे. याबाबत महापालिका प्रशासनाने सुनावणी आयोजित केली आहे. गुरुवारी (ता.२६) सकाळी ११ वाजता राजीव गांधी भवन येथील उपायुक्त (अतिक्रमण) यांच्या कार्यालयात सुनावणी होणार आहे.
महापालिकेच्या नाशिक पूर्व विभागीय कार्यालयामार्फत ३ सप्टेंबर २०२६ रोजी यासंदर्भात व्यवसायिकांना नोटीस बजावली होती. संबंधित प्रकरणात जमिनीवरील ताबा, मालकी हक्क तसेच महापालिकेच्या जमिनीच्या हिताशी संबंधित बाबींची पडताळणी केली जाणार आहे. संबंधित व्यक्ती, वकील यांनी प्रकरणाशी निगडित आवश्यक कागदपत्रे आणि पुरावे सुनावणीवेळी सादर करावेत, असे प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे. सुनावणीस उपस्थित राहून आपली बाजू मांडण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. पूर्व विभागीय कार्यालयामार्फत येथील व्यावसायिकांना सप्टेंबर महिन्यात देण्यात आलेल्या नोटिशीनंतर आता सुनावणीस हजर राहण्यासाठी पुन्हा सुनावणी पत्रवाटप करण्यात आले आहे. येथील संपूर्ण भूखंडावर सुमारे ७९ व्यावसायिक त्यांचे व्यवसाय थाटून व्यवसाय करत आहेत. पालिकेने बजावलेल्या नोटिशीनंतर यातील ४९ व्यावसायिकांनी याबाबत आक्षेप घेतला आहे. आक्षेप घेतलेल्या व्यवसायिकांना सुनावणीच्या दिवशी प्रत्यक्षात उपस्थित राहून त्यांचे म्हणणे मांडावयाचे आहे. त्यानिमित्ताने महापालिका पूर्व विभागाच्या विविध कर विभागाच्या माध्यमातून येथील आक्षेप घेतलेल्या ४९ व्यवसायिकांना सुनावणी पत्रवाटप करण्यात आले. यादरम्यान महापालिकेकडून येथील डीपी प्लॅन बाबतचे कागदपत्रे सर्वांसमोर सादर करण्यात येणार आहे. आता सुनावणीत काय होते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.