अस्‍मी पेठकर  esakal
नाशिक

अस्‍मीच्‍या ई-बुकचे होतेय कौतुक

अरुण मलानी

नाशिक : कोरोना महामारीतील पहिल्‍या व दुसऱ्या लाटेत लॉकडाउनमध्ये संपूर्ण जग ठप्प झाले होते. मात्र, या कालावधीचा योग्‍य उपयोग करताना अस्‍मी सुधीर पेठकर या विद्यार्थिनीने कौशल्‍ये आत्‍मसात केली. स्‍पर्धांमध्ये सहभाग नोंदवत भरीव कामगिरी केली. या सर्व अनुभवावर आधारित तिने ‘ई-बुक’ लिहिले असून, सादरीकरणावर आधारित गोलशीट साकारले आहे. तिच्‍या ‘ई-बुक’चे विविध स्‍तरावरून कौतुक होत आहे.

अस्‍मीने कोरोना महामारीत कौशल्‍यांवर आधारित विविध २५ कोर्स केले. याशिवाय तिने विविध प्रकारच्‍या ५५ स्‍पर्धांमध्ये सहभाग नोंदविला. या स्‍पर्धांपैकी ३४ मध्ये प्रमाणपत्र, सातमध्ये चषक व दहामध्ये पदक पटकावले आहे. अस्‍मी ही तिडके कॉलनीतील सेंट फ्रान्‍सिस हायस्‍कूलमध्ये इयत्ता नववीत शिक्षण घेत आहे. तिने व्‍हिडिओ मेकिंगचे पाच, व्‍हिडिओ एडिटींगचे तीन, इंग्‍लिश स्‍पीकिंग आणि ॲडव्हान्स्‍ड इंग्‍लिश स्‍पीकिंग, पब्लिक स्‍पीकिंग, युट्यूब चॅनल हाताळणे या कौशल्‍याधिष्ठीत प्रशिक्षणासह योगा, फिटनेस, नृत्‍य योगासूत्र, व्‍हाईट हॅट ज्‍युनिअर डेमो कोर्स, अशा कोर्सच्‍या माध्यमातून स्‍वतःचा सर्वांगीण विकास साधला. तसेच लॉकडाउन काळात तिने ऑनलाइन राष्ट्रीय पातळीवरील ५५ स्‍पर्धांमध्ये सहभाग नोंदविला. यामध्ये कविता लेखन, निबंध लेखन, वक्‍तृत्‍व, योगा, हस्‍ताक्षर आदी स्‍पर्धांचा समावेश होता. भरतनाट्यम या शास्त्रीय नृत्‍याचे ती गेल्‍या आठ वर्षांपासून शिक्षण घेत आहे.

गोलशीटद्वारे आयुष्याच्‍या प्रत्‍येक वाटचालीचे नियोजन
अस्‍मीने कोरोना महामारी काळातील अनुभवावर आधारित ‘हाऊ कोविड पॅडॅमिक चेंज्‍ड माय लाईफ’ हे ई-बुक लिहून काढले. या कालावधीत तिने गोलशीटही साकारले. यामध्ये आयुष्यातील प्रत्‍येक टप्प्‍यावर कुठल्‍या स्‍वरूपाचे शिक्षण घ्यायचे, करियरबाबतची सविस्‍तर मांडणी करून ठेवली आहे. या कामगिरीसाठी अस्‍मीला पुण्यातील सागर लाईफ स्‍कूलचे प्रमुख सागर गारवे, मुख्याध्यापिका रंजीतकौर संधू, वर्गशिक्षक अमित कुलकर्णी, भरतनाट्यम गुरू डॉ. संगीता पेठकर यांचे मार्गदर्शन लाभले. मॅनेजमेंट गुरू व लेखक एन. रघुरामन यांनी तिच्‍या ‘ई-बुक’चे विशेष कौतुक केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: ''जर इराणने माझी हत्या केली तर...'' डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः सांगितला पुढचा प्लॅन

Numerology : 'या' मुलांकाचे पुरुष लग्नानंतर बदलून टाकतात बायकोचं आयुष्य; फक्त चूल-मुल न बघता 'तिला' पोहोचवतात यशाच्या शिखरावर

शाळा शिक्षणासाठी, राजकारणासाठी नाहीत! शाळेत मुख्यमंत्री विजय यांचा कार्यक्रम दाखवण्याऱ्या मुख्यध्यापकावर कारवाई, नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : TET पेपरफुटी प्रकरणातील आरोपींना 22 जुलैपर्यंत पोलीस कोठडी

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकणवासियांना मोठा दिलासा; ठाण्यात तिकटीसाठी ११ ते ३१ जुलैदरम्यान अतिरिक्त आरक्षण खिडक्या, तीन गाड्यांचा थांबा..

SCROLL FOR NEXT