नाशिक

ई-बस आगराच्या अग्निशमन यंत्रणेचा स्थायीत पुन्हा प्रस्ताव

CD
ई-बस आगाराच्या अग्निशमन यंत्रणेचा ‘स्थायी’त पुन्हा प्रस्ताव उद्या सभा; त्रुटी दूर करून सुधारित प्रस्ताव सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २७ : ई-बस आगारात अग्निशमन यंत्रणा उभारण्याच्या प्रस्तावावरून मागील आठवड्यात झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत सभापती आणि सदस्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली होती. प्रस्तावातील त्रुटींवरून सदस्यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील यांनीही प्रस्तावातील चुका निदर्शनास आणून तो परिपूर्ण स्वरूपात सादर करण्याची टिपणी केली होती. आता प्रशासनाने सुधारित प्रस्ताव पुन्हा समितीसमोर आणला असून, शुक्रवारी होणाऱ्या बैठकीत या विषयावर काय भूमिका घेतली जाते, याकडे लक्ष लागले आहे. स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची सभा शुक्रवार (ता. ३०) रोजी दुपारी १२ वाजता होईल. सभेच्या विषयापत्रिकेवर ९ विषय असून यात प्रामुख्याने मोकाट श्वानांचे निर्बीजीकरणाचा नवीन संस्थेला काम देण्याचा प्रस्ताव, अग्निशमन विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना मुदतवाढ तसेच पाणीपुरवठ्यासाठी मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासह, पोलिस अधिक्षक कार्यालय परिसरातील नळ संयोजनाची थकीत रक्कम निर्लेखीत करण्याचा प्रस्ताव हे विषय अजेंड्यावर आहेत. सत्ताधार्यांमध्येच मतभेद? केंद्र शासनाच्या पीएम-ई-बस सेवा योजनेंतर्गत मंजूर ई-बस आगारात अग्निशमन यंत्रणा बसविण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे. तसेच पिंप्राळा-निमखेडी शिवरस्ताच्या विषयावरून देखील मागील बैठकीत चांगलाच वाद रंगला होता. प्रस्तावातील त्रुटी आणि त्याच्या सादरीकरणावरून सदस्यांनी नाराजी व्यक्त केली होती. या घडामोडींमुळे महापालिकेतील सत्ताधारी गटातील अंतर्गत मतभेद चर्चेत आले होते.

Missile attack: सौदी अरेबियाच्या संरक्षण मंत्रालयावर बॅलिस्टिक क्षेपणास्त्राने हल्ला; येमेनमधील हूती बंडखोरांचा दावा

‘राजीव गांधी पंतप्रधान व्हावेत, असं मला कधीच वाटलं नाही’; सोनिया गांधी यांचा मोठा खुलासा

Latest Marathi News Live Update : शेतकरी प्रोत्साहन निधीच्या प्रतीक्षेत, कर्जमाफीच्या चार याद्या जाहीर; वर्ष उलटूनही ५० हजारांची मदत खात्यात जमा नाही

Pune Crime : पंचतारांकित हॉटेलमधील हायप्रोफाइल सेक्स रॅकेट उघडकीस; मॉडेलिंग क्षेत्रातील दोन तरुणींची सुटका

CSK COACHING STAFF : IPL २०२७ आधी CSK मध्ये मोठे बदल! अल्बी मॉर्केल, गॅरेथ बॅटींची एन्ट्री; मोहित शर्माकडे गोलंदाजीची जबाबदारी

SCROLL FOR NEXT