नाशिक

ई-चलनच्या प्रलंबित दंडाविरोधात वाहतूकदारांची न्यायालयीन लढाई

CD
‘ई-चलन’च्या दंडाविरोधात वाहतूकदारांची न्यायालयीन लढाई नाशिकमध्ये माहिती संकलनाचे काम सुरू सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ८ : देशभरातील माल व प्रवासी वाहतूकदारांना ई- चलन प्रणालीच्या माध्यमातून आकारण्यात येणाऱ्या दंडामुळे आर्थिक, मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचा दावा केला जातो आहे. याप्रकरणी नवी दिल्‍लीतील ऑल इंडिया मोटर ट्रान्स्पोर्ट काँग्रेस या राष्ट्रीय स्तरावरील शिखर संघटनेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात नाशिकमध्येही माहिती संकलनाचे काम सुरु असल्‍याची माहिती दिली आहे. ई- चलनचा प्रलंबित दंड वसूलीसाठी रस्त्यावरच दंडाची वसुली करणे, प्रलंबित दंड असलेल्‍या वाहनांचे फिटनेस प्रमाणपत्र, परमिट, विमा आदी कामांमध्ये अडथळे निर्माण करणे, वाहन जप्त करणे तसेच दंडाच्या वसुलीसाठी वीजबिलाशी जोडणी करण्यासारख्या संभाव्य कारवाईबाबत वाहतूकदारांमध्ये चिंता व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर वाहतूकदारांच्या अडचणी न्यायालयासमोर मांडून त्यांना दिलासा मिळवून देण्यासाठी राष्ट्रीय संघटनेतर्फे याचिका दाखल करण्याची तयारी सुरू आहे. याचिकेसाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्ततेचे काम सुरू असून, देशभरातील वाहतूकदारांकडून त्यांच्या वाहनांवरील प्रलंबित ई-चलनांची माहिती संकलित केली जाते आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व मालवाहतूकदार, प्रवासी वाहतूकदार, वाहनमालक, चालक तसेच वाहतूकदार संघटनांनी वाहनांवरील प्रलंबित ई-चलनांची माहिती तातडीने उपलब्ध करावी, असे आवाहन नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्स्पोर्ट असोसिएशनतर्फे केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: मुंबईत खळबळजनक प्रकार! मोबाईलमध्ये अल्पवयीन मुलांचे 20 हजारांहून अधिक आक्षेपार्ह फोटो अन् व्हिडीओ, 49 वर्षीय व्यक्तीला अटक

IND U19 vs PAK U19: कोण आहे अर्जुन राजपूत? पाकिस्तानी गोलंदाजांना एकटा नडला अन् ठोकलं झुंजार शतक; Video

Narak Chaturdashi 2026: नरक चतुर्दशीला कणकेच्या दिव्याने का ओवाळतात? जाणून घ्या ४ धार्मिक मान्यता

Latest Marathi News Live Update: श्रीनगरमध्ये सक्रिय असलेल्या चार वॉन्टेड दहशतवाद्यांचे फोटो जारी

Malharpeth News : ११ हजार व्होल्टच्या विद्युत वाहिनीचा धक्का; नहिंबे-चिरंबेत युवकाचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT