अखेर आठ दिवसांनंतर ई-छावणी पोर्टल सुरू
देवळाली कॅन्टोन्मेंटमधील नागरिकांना मोठा दिलासा
देवळाली कॅम्प, ता. १७ : देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाची ई-छावणी ऑनलाइन सेवा गेल्या आठ दिवसांपासून बंद असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत होती. अखेर मंगळवारी (ता. १७) सायंकाळी ४ वाजता ई-छावणी पोर्टल पुन्हा सुरू करण्यात आले असून, यामुळे देवळाली कॅन्टोन्मेंटमधील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
ई- छावणी पोर्टल बंद असल्यामुळे नागरिकांना पाणीपट्टी, घरपट्टी, जन्म-मृत्यू दाखले तसेच इतर विविध कर व शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे नागरिकांना वारंवार कॅन्टोन्मेंट बोर्ड कार्यालयात हेलपाटे मारावे लागत होते. डिजिटल इंडिया आणि ऑनलाइन सेवांचा गाजावाजा होत असताना प्रत्यक्षात पोर्टल बंद पडल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत होती.
या गंभीर समस्येकडे लक्ष वेधत शिवसेना (उबाठा) पक्षाचे नेते प्रमोद मोजाड यांनी कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाकडे पर्यायी व्यवस्था तातडीने सुरू करण्याची मागणी केली होती. तसेच पोर्टल सुरू होण्यास विलंब झाल्यास नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी ऑफलाइन पद्धतीने कर व शुल्क स्वीकारण्याची व्यवस्था करावी, अशीही मागणी करण्यात आली होती. अखेर आठ दिवसांनंतर पोर्टल सुरू झाल्याने नागरिकांची ऑनलाइन व्यवहारांची अडचण दूर झाली आहे. मात्र, भविष्यात तांत्रिक कारणांमुळे ई-छावणी पोर्टल बंद पडल्यास नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी प्रशासनाने कायमस्वरूपी पर्यायी व्यवस्था तयार ठेवावी. ऑनलाइन सेवा बंद असतानाही प्रत्यक्ष कार्यालयात कर व शुल्क स्वीकारण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी अपेक्षा मोजाड यांनी व्यक्त केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.