फोटो : NSK26H33846
कोठली : ई- कचरा संकलन माहिमेच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित प्राचार्य एस. टी. माळी, डॉ. प्रदिप पाटील.
--------------
ई- कचरा वर्गीकरणामुळे प्रदूषणाला आळा
डॉ. प्रदिप पाटील : गावित विद्यालयातर्फे मोहिमेचे उद्घाटन
सकाळ वृत्तसेवा
नंदुरबार, ता. २९ : महाराष्ट्र शासनाने ई- कचरा संकलन मोहीम हाती घेतली आहे. यात जुने मोबाईल, टीव्ही, कॉम्प्यूटर, सेमीकंडक्टर व रेअर अर्थ आदी वस्तूंचे संकलन केले जात आहे. या वस्तू रिसायकल करून पुन्हा वापरल्यास भारतात आयात होणारे महागडे सेमीकंडक्टर्स व रेअर अर्थ एलेमेंट्ससाठी होणारा देशाचा खर्च कमी होईल. कचरा वर्गीकरणामुळे प्रदूषण कमी होईल, असा विश्वास डॉ. प्रदिप पाटील यांनी व्यक्त केला.
तालुक्यातील कोठली खुर्द येथील के. डी. गावित विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात ई- कचरा संकलन मोहीम राबविण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य एस. टी. माळी होते. प्रमुख पाहुणे म्हणून पंकज पाटील होते. एस. टी. माळी म्हणाले, ई- कचरा संकलनाचा प्रकल्प देशाला महासत्तेकडे नेण्यासाठी महत्त्वाचा ठरेल. यामुळे प्रदूषण नियंत्रणात राहण्यास मदत होईल. पी. डी. चौधरी, आर. एन. पाटील यांनी यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. व्ही. सी. मालके यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एम. जी. पाटील, आर. पी. पाटील, श्रीमती एस. बी. पाटील, प्रा. एस. सी. सूर्यवंशी, प्रा. ए. एस. पाटील, प्रा. एस. आर. साळुंखे, प्रा. आर. एन. राजपूत, डॉ. व्ही. बी. जाधव, निखिल पाटील, आर. आर. पाटील, सुनील गावित, कुंदन वळवी यांनी परिश्रम घेतले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.