Earnings of 1 lakh 66 thousand from Cidco swimming pool in just 12 hours esakal
नाशिक

Nashik | अवघ्या १२ तासात जलतरण तलावातून १ लाख ६६ हजाराची कमाई

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : तब्बल दोन वर्षानंतर शहरातील जलतरण तलाव सुरू झाल्याने जलतरण प्रेमीमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. सिडकोतील स्वामी विवेकानंद जलतरण तलावात अवघ्या दोन दिवसातील १२ तासात १ लाख ६६ हजार रुपयांची कमाई झाली आहे.

आश्विन नगर भागात महापालिकेचे स्वामी विवेकानंद जलतरण तलाव आहे. हा तलाव गेल्या दोन वर्षापासून कोरोनामुळे बंद होता. त्यामुळे जलतरणप्रेमींचा पुरता हिरमोड झाल्याचे दिसून येत होते. तर महापालिकेचे आर्थिक उत्पन्न बुडाले होते. परंतु आता सर्वत्रच जलतरण तलाव सुरू झाल्याने तरुणांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येते. सिडकोची जलतरण तलावात दोन दिवसात २०० ते ३०० जलतरणप्रेमींनी पोहण्याचा आनंद घेतला. अवघ्या १२ तासांमध्ये १ लाख ६६ हजार रुपयांची उत्पन्नात भर पडली आहे. सुनंदा मालसाणे यांनी येथे व्यवस्थापक म्हणून आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे.

"प्रथम जलतरण तलावाची पूर्णतः स्वच्छता करण्यात आली. त्यानंतर जलतरण तलाव पोहण्यासाठी सज्ज करण्यात आला. नुकतेच महापालिकेकडून कंपाउंड तार बसविल्याने या जलतरण तलावाला चांगली सुरक्षितता प्राप्त झाली आहे. अवघ्या दोन दिवसांमध्ये या ठिकाणी जलतरणप्रेमींनी गर्दी केल्याचे सकारात्मक चित्र दिसून येत आहे."
- बाळू नवले, प्रशिक्षक, स्वामी विवेकानंद जलतरण तलाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वारंवार शारीरिक संबंध आणि मुलाचा जन्म म्हणजेच विवाहासमान नातं, उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, काय सांगितलं?

काकांनी कमरेत हात घातला... मौनी रॉयसोबत हरियाणामध्ये छेडछाड; हटकल्यावर दिल्या शिव्या, स्टेजवर जाताच समोरून

Sahar Sheikh:''माझ्या पक्षाचा झेंडा हिरवा, त्यामुळे...'' सहर शेख यांनी पोलिसांना दिलेल्या पत्रात काय खुलासा केला?

Whatsapp New Feature : व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपचं सगळं टेन्शन संपलं! नवीन मेंबर्सही पाहून शकतील जुने चॅट; जाणून घ्या काय आहे जबरदस्त अपडेट

Local Body Election Maharashtra : ब्रेकिंग न्यूज! राज्यात जिल्हा परिषदेत भाजपने खाते उघडले, दोन उमेदवार बिनविरोध

SCROLL FOR NEXT