Ongoing preparations by the Public Ganeshotsav Mandal. esakal
नाशिक

Nashik : पूर्व विभागीय कार्यालयाने नाकारली 121 मंडळांना परवानगी

सकाळ वृत्तसेवा

जुने नाशिक : महापालिकेच्या पूर्व विभागीय कार्यालयात गणेशोत्सवाचे १८१ अर्ज मिळाले होते. त्यातील १२१ अर्ज विविध त्रुटींमुळे नाकारले आहेत, तर ४० मंडळांना अधिकृत परवानगी दिली आहे. दरम्यान, सुट्टीच्या दिवशीही रविवारी (ता. २८) विविध कर विभागाचे सहाय्यक अधीक्षक जुबेर सय्यद कार्यालयात हजर राहून मंडळांना परवानगी देत होते. (Eastern Divisional Office Denied Permission to 121 Mandal Nashik Latest Marathi News)

जुन्यांसह नवीन सार्वजनिक मंडळे या वर्षी गणेशोत्सव धूमधडाक्यात साजरा करणार आहेत. गणेशोत्सव निर्बंधमुक्त असले, तरी महापालिकेची परवानगी आवश्यक आहे. निशुल्क परवानगी मिळत असल्याने अनेक मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिका विभागीय कार्यालयांमध्ये परवानगीसाठी अर्ज केले आहेत.

पूर्व विभागीय कार्यालयात १८१ अर्ज मिळाले होते. विविध कर विभागाचे सहाय्यक अधीक्षक जुबेर सय्यद आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी सर्व अर्जांची योग्य छाननी केली. छाननीत काही मंडळांकडून एकदा, दोनदा, तीनदा नव्हे, तर तब्बल वीस वेळेस अर्ज केल्याचे आढळले. काहींचे हमीपत्र नाही, काहींकडे आधार कार्ड नाही, जागेचा नकाशा नाही, अशा त्रुटींमुळे त्यातील सुमारे १२१ अर्ज रद्द करण्यात आले.

सर्व गोष्टींची पूर्तता करून ६० अर्जांची स्वीकृती करण्यात आली. त्यातील ४० मंडळांना परवानगी देण्यात आली आहे. २० मंडळांना परवानगी देण्याचे काम प्रगतिपथावर सुरू असल्याचे सांगण्यात आले. अनेक वर्षांच्या तुलनेत यंदा सर्वाधिक अर्ज प्राप्त झाल्याचेही सांगण्यात आले.

सुट्टीच्या दिवशी कार्यालय सुरू

गणेशोत्सवास अवघे दोन दिवस शिल्लक आहेत. मंडळांना परवानगीची अडचण भासू नये, यासाठी परवानगी देण्यासाठी असलेले विविध कर कार्यालय सुट्टीच्या दिवशीही सुरू होती व मंडळांना परवानगी दिली जात होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijeet Dipke MPSC : धर्म-जातीच्या नावावर मत मागता, पण शिक्षणाचं काय?’; पुण्यातील एमपीएससी आंदोलनात अभिजीत दिपकेंचा सवाल

GST Council : GSTचे नियम बदलणार? 9 गुन्हे वगळण्याचा प्रस्ताव, अटक प्रक्रियेतही मोठी सुधारणा होण्याची शक्यता

IND vs WI, Schedule: वनडे मालिका संपली, आता ५ सामन्यांची T20I मालिका होणार सुरू; संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : देश-विदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

किटलीशिवाय कप-बशी भरणार नाही; शिट्टीपासून सावध राहा; सोमेश्वर निवडणुकीत युगेंद्र पवारांचे सूचक आवाहन

SCROLL FOR NEXT