Rajgira Sakal
नाशिक

Rajgira : आरोग्यदायी राजगिरा खातोय भाव; परदेशातून प्रचंड मागणी

उपवासासाठी आवर्जून मागणी असलेला राजगिऱ्याच्या दरांत वाढ झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक - उपवासासाठी आवर्जून मागणी असलेला राजगिऱ्याच्या दरांत वाढ झाली आहे. अर्थात केवळ श्रावण महिन्यामुळे ही दरवाढ झालेली नाही. २०२३ हे वर्ष जागतिक तृणधान्य (मिलेट) वर्ष म्हणून घोषित करण्यात आले असून, यामध्ये राजगिऱ्याचा समावेश आहे.

त्यामुळे जगभरातून त्याची मागणी वाढली आहे. देशातून याची मोठ्या प्रमाणात निर्यात केली जात आहे. यामुळे देशात जरी राजगिऱ्याची टंचाई झालेली नसली, तरी दरांत मात्र मोठी वाढ झाली आहे.

राजगिऱ्याचा आहारात वापर उपवासाच्या दिवसांमध्ये केला जातो. त्यापासून लाडू तयार केले जातात. राजगिऱ्याच्या पीठापासूनही अनेक पदार्थ बनविले जातात. विशेषत: अलीकडे शारीरिक सदृढतेसह वजन कमी करण्यासाठीही आहारात राजगिरा वापरला जातो. राजगिऱ्यात अनेक घटक समाविष्ट असल्याने गेल्या काही वर्षांमध्ये मागणीही वाढली आहे. उपवासाच्या काळात राजगिऱ्यापासून बनविल्या जाणाऱ्या लाडूंना विशेष मागणी असते.

दरम्यान, २०२३ हे वर्ष जागतिक तृणधान्य वर्ष म्हणून घोषित करण्यात आले आहे. मधुमेह, रक्तदाब, क्षयरोग, कर्करोग, अशक्तपणा यांसारख्या आजारांवर मात करण्यासाठी आहारात तृणधान्यांचा समावेश असावा यासाठी जागतिक पातळीवर आरोग्य विभागाकडून प्रयत्न केले जात आहेत.

तिपटीने वाढ

चांगल्या प्रतीच्या राजगिऱ्याचा सध्या दर सध्या प्रतिकिलो १५५ रुपये असून, यात सुमारे ६० ते ६५ रुपयांची वाढ झालेली आहे. तर, राजगिऱ्याच्या पिठाचे दरही कडाडले असून, ते प्रतिकिलो २६० ते ३०० रुपये झाले आहेत. होलसेलमध्येच राजगिऱ्याचे दर तिपटीने वाढले आहेत. राजगिऱ्याच्या लाडूचे दर हे पॅकेटनुसार असतात. परंतु त्यातही किरकोळ वाढ झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT