35138
धुळे : ‘अविष्कार’ विभागीय स्तरावरील संशोधन स्पर्धेत पदक पटकावणाऱ्या ओम जाधव, मार्गदर्शक प्रा. डॉ. प्रफुल्ल शिंदे यांच्यासह प्राचार्य डॉ. समीर गोयल.
--
धुळे एसव्हीकेएमच्या ओम
जाधवची राज्यस्तरावर निवड
केळीच्या सालींपासून पर्यावरणपूरक पॉलिशिंगची निर्मिती
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १६ : टाकाऊ केळीच्या सालींपासून पर्यावरणपूरक पॉलिशिंग उत्पादन विकसित केल्याबद्दल धुळे एसव्हीकेएम फार्मसी महाविद्यालयाचा विद्यार्थी ओम दीपक जाधव याने ''अविष्कार'' विभागीय स्तरावरील संशोधन स्पर्धेत पदक पटकावले. या यशाच्या बळावर त्याची राज्यस्तरीय अविष्कार संशोधन स्पर्धेसाठी निवड झाली असून तो डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे (डी बाटू) प्रतिनिधित्व करणार आहे.
नाशिक येथील आर. जी. सपकाळ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी येथे झालेल्या या स्पर्धेत ओमने ‘डेव्हलपमेंट ऑफ अँन इको-फ्रेंडली पॉलिशिंग प्रॉडक्ट फ्रॉम वेस्ट बनाना पिल्स’ हा अभिनव प्रकल्प सादर केला. प्रा. डॉ. प्रफुल्ल शिंदे यांच्या मार्गदर्शनात विकसित केलेल्या या प्रकल्पातून जैविक कचऱ्याचा पुनर्वापर आणि शाश्वत विकासाचा संदेश देण्यात आला आहे. उपलब्ध संसाधनांचा योग्य वापर करून पर्यावरणावरील कचऱ्याचा भार कमी करण्याच्या दृष्टीने हे संशोधन महत्त्वपूर्ण ठरले आहे.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री अमरिशभाई पटेल, सहअध्यक्ष भूपेश पटेल, उपाध्यक्ष चिंतन पटेल, एसव्हीकेएम एनएमआयएमएस ग्लोबल युनिव्हर्सिटी प्रेसिडेंट स्नेहा अंकित पारिख, व्यवस्थापन समितीचे सदस्य राजगोपाल भंडारी, धुळे कॅम्पसचे अध्यक्ष संजय अग्रवाल, मार्गदर्शक डॉ. अजय पसारी, कुलगुरू डॉ. अंकुर कुलकर्णी, कुलसचिव डॉ. हर्षल साळुंखे, प्राचार्य डॉ. समीर गोयल यांनी ओम जाधव व प्रा. डॉ. प्रफुल्ल शिंदे यांचे कौतुक केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.