Education department neglects Zilla Parishad school Nashik News esakal
नाशिक

जिल्हा परिषदेच्या शाळेवर शिक्षण विभागाचं दुर्लक्ष

हिरामण चौधरी

पळसन (जि. नाशिक) : ग्रामपंचायत रोंघाणे जिल्हा परिषद शाळा (ZP School) सांबरखल येथे २०२१ ला अवकाळी पावसाने शाळेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. मात्र याची तात्काळ दखल घेत गावातील नागरिकांनी शाळेच्या प्रश्नांवर शिक्षण विभागाला पत्रव्यवहार करून संपूर्ण शाळेचे नुकसान झाल्याने शिक्षण घेण्यास जागा नाही, म्हणून नवीन इमारतीची मागणी केली होती.

मात्र या प्रश्नावर शिक्षण विभागाने कोणतीही कारवाई न करता 1 वर्ष होऊन 4 महिने ऊलटले तरीही या मागणीकडे दुर्लक्ष केले. आज तेथील विद्यार्थी, मंदिरात तर कधी एखाद्या घराच्या छोट्या खोलीत शिक्षण घेत आहेत, तरी या विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे म्हणून दि. 13 एप्रिल रोजी शिक्षणाचा अधिकार (Right to Education) मिळावा म्हणून जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी आपला हक्क मिळवून घेण्यासाठी श्रमजीवी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह पंचायत समितीत (Panchayat samiti) शाळा भरवली. सर्व जण श्रमजीवी संघटनेचा झेंडा हाती घेऊन गटशिक्षण अधिकारी यांच्या दालनात ठिय्या धरून बसले होते आणि जोपर्यंत शिक्षणासाठी इमारत मिळत नाही तोपर्यंत तुमच्या कार्यालयात शिक्षणासाठी जागा उपलब्ध करून द्या, अशी मागणी शाळेतील विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी केली होती.

यावर आज आंदोलन केले असता गटशिक्षण अधिकारी यांच्याकडून नवीन शैक्षणिक वर्षात 15 जून 2022 पूर्वी दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात येईल, असे लेखी आश्‍वासन देण्यात आले. यावेळी सुरगाणा पोलीस निरीक्षक संदिप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक निलेश बोडके,हेमंत भालेराव, प्रभाकर सहारे, तुळशीराम चौधरी, इंद्रजित बर्डे यांच्याकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

आंदोलनात सहभागासाठी सुरगाणा तालुका अध्यक्ष राजू राऊत, सचिव दिनेश मिसाळ, महिलाप्रमुख मंगला गावित, नाशिक जिल्ह्य सरचणीस संजय शिंदे, नाशिक जिल्ह्य अध्यक्ष रामराव लोंढे, कार्यकर्ते वसंत घांगळे व सांबरखल गावातील विद्यार्थी आणि त्यांचे पालक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price Today: कच्चे तेल 100 डॉलर पार! देशात नवे इंधन दर जाहीर; तुमच्या शहरातील पेट्रोल, डिझेल आणि CNG चे दर किती?

Thackeray Brothers on Student Protest: विद्यार्थी आंदोलनाने ठाकरे बंधू एकवटले; आंदोलकांच्या पाठिंब्यासाठी ठाकरेंची दुसरी पिढी मैदानात

Latest Marathi News Live Update : पुण्यातील खडकवासला धरण 100 टक्के भरले; 4800 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग मुठा नदीत सुरू

Godavari River Floods Nashik : नाशिक पुराच्या विळख्यात! दुतोंड्या मारुती पाण्याखाली, गंगापूर धरणातून विसर्ग वाढला; गोदाकाठावर हायअलर्ट, पाहा स्थिती

NEET UG Paper Leak: ज्याला मानलं जात होतं पेपरफुटीचा 'मुख्य सूत्रधार', त्यालाच CBI ची क्लीन चिट; चार्जशीटमध्ये नेमकं काय?

SCROLL FOR NEXT