Dr. Vaishali veer Jhankar Sakal
नाशिक

लाच प्रकरण : डॉ. वैशाली वीर-झनकरांचा कारागृहात मुक्काम वाढला

विनोद बेदरकर

नाशिक : लाचप्रकरणात पोलिसांना गुंगारा देऊन अडचणीत सापडलेल्या शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली वीर-झनकर यांचा नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहातील मुक्काम वाढला आहे. नियमित जामीन अर्जावरील सुनावणी पुन्हा दोन दिवस म्हणजेच, सोमवार (ता. २३)पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.


या प्रकरणात न्यायालयाने गेल्या बुधवारी (ता. १८) झनकर यांचे साथीदार शिक्षक पंकज दशपुते व चालक ज्ञानेश्‍वर येवले यांना जामीन मंजूर केला असून, त्यांची कारागृहातून सुटका झाली आहे. झनकर यांनी अटकेपूर्वी पोलिसांना गुंगारा दिला होता, तसेच उपचाराच्या नावाखाली बहुतांश काळ जिल्हा रुग्णालयात गेल्याची दखल घेत न्यायालयाने रुग्णालय प्रशासनास नोटीस बजावली आहे. यादरम्यान नियमित जामीन अर्जावर शुक्रवारी (ता. २०) सुनावणी होणार होती; परंतु ही सुनावणी आता सोमवारपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे झनकर यांना आणखी दोन दिवस जामिनासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.


निलंबनही लांबले

दरम्यान, डॉ. वैशाली वीर-झनकर यांच्या अटकेनंतर शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांनी त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव शासनास सादर केला आहे. मात्र, आठवडाभराचा कालावधी उलटूनही शासन स्तरावरून दखल घेण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे शिक्षण उपसंचालकांनी निलंबन अहवालापाठोपाठ केलेल्या पत्रव्यवहारात शासनस्तरावरून होणाऱ्या दिरंगाईमुळे शिक्षण विभागाची प्रतिमा मलिन होत असल्याचे नमूद केले आहे. तरीही झनकर यांच्यावर अद्याप कारवाई झालेली नाही. त्यामुळे डॉ. वैशाली वीर-झनकर प्रकरणात शासनाच्या भूमिकेकडेही संपूर्ण शिक्षण क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune University Mess Fee Hike: पुणे विद्यापीठातील मेस दरवाढीचा भार विद्यार्थ्यांवर नको; विद्यापीठाने अनुदान द्यावे: ‘विद्यार्थी संघर्ष कृती समिती’ची मागणी

Chhatrapati Sambhajinagar crime control: दहशत माजवणाऱ्या संदिप फटाकडेला छ. संभाजीनगर जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार

Marathi News Live Updates : माढ्यात सीना नदीत ५ तरुण बुडाले

Sugarcane Mechanization: ऊसतोड मजुरांच्या मनमानीला कंटाळून शेतकऱ्यांचा यंत्रांकडे मोर्चा; आधुनिक हार्वेस्टरमुळे वेळ व खर्चात बचत

Banjara ST reservation protest: येलदरी जलाशयात बंजारा समाजाचे जलसमाधी आंदोलन; विनोद आडे यांच्या आमरण उपोषणाला व्यापक पाठिंबा

SCROLL FOR NEXT