(पान १ ला ॲंकर)
फोटो : NSK26H33217
नंदुरबार : पंडीत दिनदयाल पतपेढीतर्फे आयोजित गुणवंत गौरव सोहळ्याप्रसंगी उपस्थित अजय शर्मा, नानाभाऊ माळी, सचिव पांडुरंग आदी.
------------------
शिक्षणाने नम्रता, योग्यता आणि जीवनाची सफलता
अजय शर्मा : पंडीत दिनदयाल पतपेढीतर्फे गुणवंतांचा गौरव
सकाळ वृत्तसेवा
नंदुरबार, ता. २१ : शिक्षण हे मानवी जीवनाचे मूळ आहे. शिक्षणाने आपल्या अंगी विनम्रता येते. विनम्रतेतून योग्यता येते आणि योग्यतेतून सफलता मिळते, असे प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेचे पूर्णवेळ कार्यकर्ते अजय शर्मा यांनी केले. येथील पं. दीनदयाल उपाध्याय नागरी सहकारी पतपेढीतर्फे गुणगौरव समारंभ श्रॉफ हायस्कूलच्या साईबाबा हॉलमध्ये झाला. त्यावेळी ते बोलत होते.
श्री. शर्मा म्हणाले, आपला मुलगा खूप शिकावा, त्याने आपले नाव मोठे करावे असे प्रत्येक आई- बापाचे स्वप्न असते. शिक्षणाने ज्ञानाबरोबरच संस्कार विकसित झाले पाहिजे. आपल्या पूर्वजांनी दिलेले संस्कार पुढच्या पिढीत संक्रमित झाले पाहिजेत. दिनदयाल उपाध्याय यांनी वडीलधारी मंडळींचा सन्मान करण्याचे संस्कार दिले आहेत. विद्यार्थ्यांनी त्यांचे हे गुण घेतले पाहिजेत, असे त्यांनी सांगितले. पतपेढीचे चेअरमन नानाभाऊ माळी यांनी प्रास्ताविक केले. पतपेढीच्या स्थापनेला ४२ वर्ष पूर्ण झाली. सभासदांचा आर्थिक विकास व्हावा या जाणिवेतून आर्थिक बळ दिले. पतपेढी ही सभासदांच्या सुख- दुःखाशी समरस झाली आहे. पतपेढी सभासदांना आजारपणात मदत करीत असते, असेही माळी म्हणाले. पतपेढीचे सर्व आजी - माजी चेअरमन, व्हा. चेअरमन आणि सर्व संचालकांच्या परिश्रमाने पतपेढीने जिल्ह्यात नावलौकिक मिळवला आहे, असे त्यांनी सांगितले.
पतपेढीचे सचिव पांडुरंग माळी यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. नानाभाऊ माळी यांच्या हस्ते अजय शर्मा यांचा सत्कार करण्यात आला. दीर्घ आजारपणात शस्त्रक्रिया झालेल्या सभासदांना कल्याण निधीतून आर्थिक मदत दिली. सुदाम राजपूत, कैलास कासार, श्याम कासार, संजय माळी, रुपाली माळी या सभासदांना अजय शर्मा आणि मान्यवरांच्या हस्ते प्रत्येकी दहा हजार रूपयांचे धनादेश प्रदान करण्यात आले.
पतपेढीचे संचालक तथा नगरसेवक आनंद माळी, सभासद योगेश शास्त्री, राजेंद्र माळी, राहुल शाह, सभासद लक्ष्मण माळी व नगरसेविका सारिका माळी यांचा अजय शर्मा यांनी सत्कार केला.
गुणवंत विद्यार्थी डॉ. अभिषेक जाधव यांनी आभार मानले. फकिरा माळी यांनी सूत्रसंचालन केले. व्हा. चेअरमन मोहन चौधरी यांनी आभार मानले. कार्यक्रमाला संचालक आनंद माळी, भगवान माळी, प्रसाद बेहेरे, डॉ. मुकेश मराठे, राधेश्याम सराफ, रणवीरसिंग पाडवी आणि संचालिका कल्पना फटकाळ, जयश्री माळी, पुष्पबेन पटेल उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रशांत कासार, शिवाजी माळी यांनी परिश्रम घेतले.
-------------
गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
विविध स्पर्धांमध्ये प्राविण्य मिळविलेल्या १०४ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. गुणवंत विद्यार्थ्यांचे पालक म्हणून गौरीशंकर धुमाळ यांनी पतपेढीविषयी कृतज्ञता व्यक्त केली. योगेश शास्त्री यांनी पतपेढी ज्ञानाला आणि गुणाला वंदन करीत असते, अशी भावना व्यक्त केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.