In the presence of Education Commissioner Suraj Mandhare and MLA Satyajit Tambe, a meeting was held regarding the issues of teaching and non-teaching staff. esakal
नाशिक

Nashik News: शिक्षकांच्या कामांसाठी शिक्षणतर्फे सॉफ्टवेअर विकसित केले जाणार; मांढरेंचे तांबेंना आश्‍वासन

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : शैक्षणिक संस्थांच्या अथवा वैयक्तिक कामांसाठी शिक्षकांना सरकारी कार्यालयात खेटे घालावे लागत असल्याने त्यांचा वेळ वाया जातो. त्यामुळे यापुढे अशा कामांच्या पाठपुराव्यासाठी प्रत्यक्ष कार्यालयात येण्याची गरज पडू नये म्हणून सहा महिन्यात मार्ग काढावा, अशी मागणी आमदार सत्यजित तांबे यांनी केली.

त्यावर तंत्रज्ञानाच्या मदतीने एक सॉफ्टवेअर तयार केले जाईल, असे आश्वासन शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी दिले. तसेच शिक्षक-शिक्षकेत्तरांच्या प्रश्‍नांवर तोडगा काढला जाईल, असेही श्री. मांढरे यांनी सांगितले. (Education to develop software for teachers work suraj mandhare assurance to satyajeet tambe Nashik News)

पुण्यातील शिक्षण आयुक्तांच्या दालनात श्री. मांढरे, श्री. तांबे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. माध्यमिक शिक्षण विभागाचे संचालक के. के. पाटील, प्राथमिक शिक्षणचे उपसंचालक टाके, सहसंचालक पानझडे, उपसंचालक वंदना राऊळ आदी उपस्थित होते.

बैठकीत विनाअनुदानित वरून अनुदानित केलेल्या शाळांबाबतच्या निर्णयाला स्थगिती देण्याचा मुद्दा श्री. तांबे यांनी उपस्थित केला. त्यावर याबाबत सरकारकडे पाठपुरावा सुरू असल्याचे श्री. मांढरे यांनी स्पष्ट केले.

तसेच राज्यातील संच मान्यतेबाबतच्या अडचणींकडे श्री. तांबे यांनी लक्ष वेधले. मग श्री. मांढरे यांनी राज्यात संच मान्यतेचे काम ६० टक्के पूर्ण झाल्याचे सांगितले. तसेच नगर आणि नाशिक या दोन्ही जिल्ह्यांमध्ये काम अद्याप कमी असून माहिती घेत कामासाठी टाइम स्लॅब' रद्द केला जाईल, असेही आयुक्तांनी सांगितले.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

थकीत फरक बिलांचा पाठपुरावा

आधार अपडेशनचा मुद्दा श्री. तांबे यांनी उपस्थित करताच, ८५ टक्के आधार अपडेशन झालेल्या शाळांना मुदतवाढ देण्यात येईल, असे श्री. मांढरे यांनी सांगितलं. त्यामुळे शाळांनी ८५ टक्के आधार अपडेशन करण्यावर भर द्यावा, असेही त्यांनी सूचित केले.

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या थकीत फरक बिलांबाबत राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे. लवकरच ही बिले चुकती केली जातील, असेही श्री. मांढरे यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup: आम्ही फायनल खेळणार... पाकिस्तानी खेळाडूचा ओव्हरकॉन्फिडन्सच तर पाहा; Viral Video

काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते Hanumant Pawar यांना भाजपच्या Tushar Damgude यांच्यासह ३-४ जणांकडून मारहण

Latest Marathi News Live Update : पुणेकरांचे आरोग्य धोक्यात, धूळ आणि धूर यामुळे अनेकांना श्वासनाचे आजार

Nashik Ring Road : शेतकऱ्यांच्या जमिनीवर गदा नको; खासदार राजाभाऊ वाजेंच्या मध्यस्थीनंतर रिंगरोडचा मार्ग बदलणार?

Ayurvedic Skincare Tips : महागड्या क्रीम कशाला? रात्री झोपताना लावा फक्त 1 गोष्ट; उन्हात काळवंडलेला चेहरा दुसऱ्याच दिवशी होईल टवटवीत!

SCROLL FOR NEXT