Laborers planting seeds in the field in anticipation of the price of the cabbage crop. esakal
नाशिक

Unseasonal Rain : अवकाळीमुळे कोबी बियाणे टाकण्यावर परिणाम; सामान्य वातावरणाची बळिराजाला प्रतिक्षा

सकाळ वृत्तसेवा

Unseasonal Rain : कसमादे भागात सध्या पावसाळी कोबी बियाणे टाकण्याची लगबग शेतकऱ्यांकडून सुरु आहे. अवकाळीच्या फटक्यामुळे लहान शेतकरी हे पीक घेण्यासाठी उत्सुक दिसत आहेत. सध्या बाजारात शेतकऱ्यांच्या पसंतीचे बियाणे उपलब्ध नसल्याने कोबी उत्पादक कोणत्या कंपनीचे बियाणे टाकावे या संभ्रमात आहेत.

अवकाळी पाऊस रोज हजेरी लावत आहे. बियाणे टाकून नुकसान होवू नये म्हणून बहुसंख्य शेतकरी वातावरण सामान्य होण्याची वाट पाहत आहेत. (Effect of Unseasonal Rain on Cabbage Seeding farmers wait normal environment nashik news)

दिवसभर कडक उन्हामुळे नागरिक त्रस्त होत आहेत. सायंकाळी चारनंतर होणाऱ्या ढगाळ वातावरणामुळे बेमोसमी पावसाची शक्यता असते. सध्या काही ठिकाणी पावसाळ्यासारखा पाऊस होत आहे.

केरसाणे, दसाणे परिसरात हा कोबी पिकाचे उत्पादन घेण्यात अग्रेसर आहे. बदललेल्या वातावरणामुळे यावर्षी शेतकरी हे पीक घेण्यासाठी द्विधा मनःस्थितीत आहेत. शेतीमालाला भाव नसल्यामुळे आता शेतकरी काळजीत आहेत.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

कांदा पाठोपाठ टोमॅटोचे दरही कोसळले आहेत. अनेक टोमॅटो उत्पादकांनी तोडणी बंद केल्याने शेतातच टोमॅटो लाल होत आहे. त्यामुळे कोबीची काय अवस्था राहील अशी चर्चा शेतकऱ्यांमध्ये आहे. कसमादे परिसरातील शेतकऱ्याकडून युरो २, वीर, ३३३, डॉलर, बॉटर, सुकुती या कोबी बियाण्यांना पसंती असते.

"अवकाळी पावसामुळे कोबी बियाणे खरेदी करणाऱ्याची संख्या कमी आहे. काही बियाणे कंपन्या अद्यापपर्यत बाजारात आलेल्या नाही. उत्पादकांच्या पसंतीचे बियाणे आल्यास थोड्याफार प्रमाणात विक्री होईल." - भरत सोनवणे , संचालक, किसान मॉल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: ''मोदींमार्फत अल्लाने सगळं दिलंय, कुणाची मदत नको'' अपंग असलेल्या मुस्लिम व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल

माेठी बातमी! 'सातारा जिल्ह्यातील आमदार आठ महिने निधीविनाच'; फंडातील विविध कामांना ब्रेक, अधिवेशनात घोषणेची शक्यता

Viral Video: नवरा फोनमध्ये व्यस्त, पत्नी संतापली, रागात असं काही केलं की...; व्हिडिओच व्हायरल झाला, पाहा पोस्ट

Ashadhi Wari 2025: मृदंगाच्या थापाने वाढविली वारकऱ्यांची ऊर्जा; घळाटवाडीच्या गणेश महाराजांची पंढरीच्या वारीत वादनसेवा

Tata Group: टाटा ग्रुपच्या कंपनीचा शेअर 10 टक्क्यांनी घसरला; ब्रोकरेजनेही दिला अलर्ट, गुंतवणूकदार चिंतेत

SCROLL FOR NEXT