Unseasonal Rain : प्लास्टिक कागद खरेदीला वाढली मागणी; दरात वाढ

Farmers buying plastic in the plastic market
Farmers buying plastic in the plastic market esakal

Nashik News : बेमोसमी पाऊस व गारपिटीमुळे शेतकरी हतबल झाला आहे. काढणीला आलेला उन्हाळी कांदा, भाजीपाला व फळपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. कांदा व इतर शेती पिकांच्या पावसापासून बचावासाठी शेतकरी प्लॅस्टिक कागद खरेदी करीत आहेत. (unseasonal rain Increased demand for buying plastic paper nashik news)

गेल्या वर्षाच्या तुलनेने यंदा प्लॅस्टिक १५ टक्क्यांनी महागले आहे. बेमोसमी पावसामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. ऐरवी जुनमध्ये प्लॅस्टिक कागद खरेदी केला जायचा. यावर्षी ऐन उन्हाळ्यात पाऊस पडत असल्याने प्लॅस्टिक कागद, जुने बॅनर्स खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी होत आहे.

तालुक्यासह कसमादेत दोन महिन्यांपासून बेमोसमी पाऊस थैमान घालत आहे. शेती पिकांचे विशेषत: कांदा, भाजीपाला, टरबूज, खरबूज आदींचे सर्वाधिक नुकसान होत आहे. कांद्याचे प्रचंड नुकसान झाले. बहुसंख्य शेतकऱ्यांचा कांदा शेतातच सडला.

अजून काही ठिकाणी कांदा काढणीचे काम सुरु आहे. बहुसंख्य शेतकऱ्यांनी चाळींमध्ये कांदा भरून ठेवला आहे. कांदा झाकण्यासाठी शेतकरी प्लॅस्टिक कागद खरेदी करीत आहेत. येथील किदवाई रस्त्यावर भरणाऱ्या प्लास्टिक बाजाराला दोन महिन्यांपासून झळाळी आली आहे. येथे रोज हजारो मीटर प्लास्टिक कागद व जुने बॅनर्स विकली जात आहेत.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Farmers buying plastic in the plastic market
Nashik News : धारगाव आरोग्यकेंद्र असून नसल्यासारखे; आदिवासी भागातील रूग्णांची गैरसोय

कांदा चाळीला झाकण्यासाठी काही शेतकरी डांबर (काळी) ताडपत्रीची मागणी करीत आहे. येथील बाजारात ४० ते ६० रुपये दरम्यान मीटरने प्लॅस्टिक कागद मिळत आहे. प्लॅस्टिकमध्ये १५ बाय ३० तसेच १५ बाय ४० या दोन प्रकाराच्या मोठ्या आकाराच्या कागदाला मागणी आहे. शहरात प्लॅस्टिकचा बाजार वीस वर्षापासून भरत आहे.

बाजारात स्पर्धा असल्याने ग्राहकांना स्वस्त दरात कागद मिळतो. कसमादे परिसरातील शेतकरी बांधव येथे प्लॅस्टिक कागद खरेदीसाठी येत आहेत. येथील बाजारात डांबरी ताडपत्री, जुने बॅनर, हिरवी जाळी, काळा, पिवळ्या रंगाचे प्लॅस्टिक कागदी विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्लॅस्टिक कागद अहमदाबाद येथून तर जुने बॅनर्स मुंबई येथून विक्रेते आणतात. जुनी बॅनर्स ९० रुपये किलो प्रमाणे विकला जात आहे.

"मालेगावला २० वर्षापासून प्लॅस्टिक कागद व जुने बॅनर्स विकले जातात. कमी नफ्यात आम्ही व्यवसाय करतो. बहुसंख्य नागरिक १० बाय १० आकाराच्या बॅनरची मागणी करतात. शेतकरी मोठ्या आकाराचे कागद व बॅनर्स घेतात. यावर्षी मार्चपासूनच व्यवसाय वधारला आहे." - हमीद अन्सारी, भारत प्लॅस्टिक, मालेगाव

"अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना नाकीनऊ आणले आहे. कांद्याला भाव मिळत नाही. त्यात नैसर्गिक संकटांचा शेतकऱ्यांना सामना करावा लागत आहे. पावसापासून शेती मालाचा बचाव होण्यासाठी ताडपत्री, प्लॅस्टिक कागदाची मोठ्या प्रमाणात खरेदी करावी लागत आहे." - विक्रम वाघचौरे, शेतकरी, निमगाव खुर्द

Farmers buying plastic in the plastic market
Nashik News : मनमाड शहराची आर्थिक उलाढाल मंदावली; अर्थव्यवस्थेवर परिणाम

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com