नाशिक

एआयद्वारे अध्यापक- कार्यशाळा

CD
धुळे टुडे २ साठी... --- ‘एआय’द्वारे प्रभावी अध्यापनाचे प्राध्यापकांना धडे देवरे तंत्रनिकेतन व टाटा स्ट्राईव्हतर्फे प्राध्यापक विकास कार्यशाळा सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. ९ ः श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेच्या बापूसाहेब शिवाजीराव देवरे तंत्रनिकेतन आणि टाटा स्ट्राईव्ह यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षकांसाठी ‘इफेक्टिव्ह टीचिंग थ्रू एआय’ अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून प्रभावी अध्यापन या विषयावर दोनदिवसीय राज्यस्तरीय प्राध्यापक विकास कार्यक्रमाचे (एफडीपी) आयोजन करण्यात आले. ऑनलाइन पद्धतीने झालेल्या या कार्यशाळेचा गुरुवारी (ता. ८) समारोप झाला. राज्यातील विविध तंत्रनिकेतनमधील तीनशेहून अधिक प्राध्यापकांनी या कार्यशाळेत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. ७ ऑक्टोबरला बापूसाहेब देवरे तंत्रनिकेतनमध्ये प्राचार्य प्रा. संजय हिरे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यशाळेचा प्रारंभ झाला. याप्रसंगी एफडीपी को-ऑर्डिनेटर, कार्यशाळा अधीक्षक व ट्रेनिंग प्लेसमेंट अधिकारी प्रा. सुधीर चौधरी उपस्थित होते. तंत्रज्ञानाच्या आधुनिक युगात दैनंदिन अध्यापन पद्धती अधिक सोपी, रंजक आणि प्रभावी बनविण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) टूल्सचा वापर कसा करावा, याचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देणे हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश होता. ७ व ८ ऑक्टोबरला विविध सत्रांमध्ये टाटा स्ट्राईव्हचे सुदर्शन धाररूरकर, अमोल जाधव, मंगेश मोकल, वीरेंद्रसिंग यादव, विभावरी वर्मा व डॉ. जेफीन जॉन्स यांनी एआय तंत्रज्ञानाच्या वापरा संदर्भात मार्गदर्शन केले. संस्थेचे अध्यक्ष कुणाल पाटील, महाविद्यालयाचे अध्यक्ष व चीफ पॅट्रन सुभाष देवरे आणि उद्योजक व पॅट्रन विलास देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळेचे नियोजन करण्यात आले. विभागप्रमुख प्रा. डी. एस. पाटील, प्रा. सुनील मुंदडा, प्रा. निशाद पटेल, प्रा. महेंद्र पाटील, प्रा. जमिल अन्सारी व प्रा. रत्ना पाटील यांनी विभागीय समन्वयक प्रा. प्रसाद मराठे, प्रा. नम्रता माळी, प्रा. साहिल पाटील, प्रा. अमोल सोनवणे, प्रा. रेणुका धात्रक, प्रा. हर्शल चौधरी व प्रा. प्रेरणा भिंगारे यांच्या समवेत कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Student Agitation : परवानगी रद्द केल्यानंतरही आंदोलन; ‘एमपीएससी’ आंदोलक विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल

गुलाबजामच्या पाकात उंदीर, भिवंडीतील मिठाईच्या दुकानात किळसवाणा प्रकार; Video Viral होताच एफडीएचा छापा

Maharashtra Live News : मध्य रेल्वेवर रविवारी मेगा ब्लॉक; लोकल गाड्यांच्या वेळापत्रकात बदल

IND vs WI 2nd T20I: वैभव सूर्यवंशीला आज तरी संधी मिळाली का? श्रेयस अय्यरने जाहीर केली Playing XI, विंडीजच्या संघात एक बदल

Kannad News : जामडी (घाट) येथे 19 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन संपविले जीवन; कन्नड तालुक्यातील घटना

SCROLL FOR NEXT