army recruitment
army recruitment esakal
नाशिक

Army Recruitment : युवकांना खुणावतेय ‘सैन्यदल’; दरवर्षी 10 हजार युवकांचे प्रयत्‍न

अरूण मलाणी

नाशिक : उत्तम करिअर घडविण्यासोबत देशसेवेची संधी प्राप्त करून घेण्यासाठी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची धडपड वाढली आहे. वेगवेगळ्या स्तरावरून सैन्‍यदलात दाखल होण्यासाठी नाशिक जिल्ह्यातून दरवर्षी सुमारे दहा हजारावर युवक प्रयत्‍न करत आहेत. वर्षागणिक ही संख्या वाढते आहे. 'एनडीए' पाठोपाठ 'सीडीएस' परीक्षेस सामोरे जाणाऱ्या उमेदवारांची संख्या लक्षणीय आहे. (Efforts of 10 thousand youth every year for Indian Army Recruitment Nashik News)

काही वर्षांपूर्वीपर्यंत सैन्यदलात भरतीकडे वळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या तोकडी होती. परंतु सातत्‍याने जनजागृती होत असल्‍याने या क्षेत्रातील ‘करिअर'कडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढत आहे. औरंगाबाद येथील एसपीआय संस्‍थेत प्रवेशापासून तर एनडीए परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दरवर्षी वाढते आहे. पदवीनंतर लष्करात ‘करिअर'चे मार्ग असलेल्‍या सीडीएस व त्यासारख्यास्‍तरासाठी उमेदवारांकडून प्रयत्‍न सुरू आहेत.

नाशिकमध्ये सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्‍युकेशन सोसायटी संचालित भोसला सैनिकी स्कूलच्‍या माध्यमातून मुला-मुलींना शालेय शिक्षणापासून सैन्‍य दलात भरतीसाठी तयारी करून घेतली जात आहे. पुढे औरंगाबाद येथील एस.पी.आय. संस्‍थेत प्रवेश मिळविण्यासाठी प्रवेश परीक्षा देणाऱ्या विद्यार्थी संख्येत वाढ होत आहे. त्‍यातही ‘अग्‍निवीर' सारख्या योजनांमुळे सैन्‍य दलात भरती होण्यासाठी प्रयत्‍न करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ होणार आहे.

एनसीसी उपक्रम फायदेशीर

शाळा, महाविद्यालयीन जीवनात राष्ट्रीय छात्रसेना (एनसीसी) मध्ये सहभागी होणाऱ्या कॅडेड्‌सचे प्रमाण वाढते आहे. इथे घेतलेल्‍या प्रशिक्षणाचा फायदा युवकांना पदवीनंतरच्‍या सीडीएस या परीक्षेसाठी होतो आहे. दरम्यान, नाशिकमध्ये प्रशिक्षणासाठी पुरक वातावरण उपलब्‍ध होत असून इथला निकाल समाधानकारक राहतो आहे. त्‍यामुळे राज्‍यातील सर्व छोट्या-मोठ्या शहरांतून विद्यार्थी नाशिकला शिक्षणासाठी येताहेत. इथल्या शिकवण्यांमध्ये विविध शहरांतील विद्यार्थी शिक्षण घेताय.

'ति'चा लवकरच सहभाग

एनडीएची दारे मुलींसाठी खुली झालेली असून गेल्यावर्षी नोव्‍हेंबरमध्ये मुलींसाठी प्रवेश परीक्षा घेतली घेण्यात आली. या परीक्षेसाठी सद्यःस्‍थितीत नाशिकमध्ये सुमारे शंभराहून अधिक विद्यार्थिनी अभ्यास करत आहेत. येत्‍या वर्षभरात एनडीएमध्ये दाखल होणाऱ्या उमेदवारांमध्ये नाशिकच्‍या विद्यार्थिनीचा सहभाग असेल, असे सध्याचे आशादायी चित्र आहे.

आकडे बोलतात...

(दरवर्षी परीक्षेला सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या)

एसपीआय औरंगाबाद------दोन हजार.

एनडीए परीक्षा------------अडीच हजार

सीडीएस----------------दोन ते अडीच हजार

अन्‍य भरती प्रक्रिया--------तीन ते चार हजार

राष्ट्राच्या रक्षणाचे व्रत

राष्ट्र रक्षा समं पुण्यं,

राष्ट्र रक्षा समं व्रतम्।

अर्थात, राष्ट्राचे रक्षण हे पुण्यासारखे आहे. राष्ट्राचे रक्षण करणे हे व्रत करण्यासारखे आहे.

"गेल्‍या काही वर्षांमध्ये सैन्‍य दलात भरती होण्यासाठी प्रयत्‍न करणाऱ्या विद्यार्थ्यांच्‍या संख्येत वाढ झाली आहे. जनजागृतीमूळे हा सकारात्‍मक बदल घडलेला असून नाशिकला राज्‍यातील अन्‍य शहरांतील विद्यार्थी तयारीसाठी येतात. मुली तितक्‍याच कष्टाने तयारी करत असल्‍याने लवकर नाशिकच्‍या भूमीतील मुली एनडीएमध्ये प्रशिक्षण घेत अधिकारी झालेल्‍या दिसतील."

- हर्षल आहेरराव (संस्‍थापक, सुदर्शन अकादमी)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident Viral Video : कल्याणीनगर अपघातातील अल्पवयीन आरोपीचे शिवीगाळ करणारे रॅप साँग व्हायरल?

Swati Maliwal Rajya Sabha Membership: '...काहीही झालं तरी मी माझं पद', स्वाती मालीवाल यांनी राज्यसभेच्या राजीनाम्याबाबत केले स्पष्ट

Latest Marathi News Live Update : आरोपी विशाल अग्रवालच्या नातेवाईकांकडून पत्रकारांना शिवीगाळ, दमदाटी

Nashik News : सिन्नरमध्ये मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या दोघांचा कुंदेवाडी बंधाऱ्यात बुडून मृत्यू; कुटुंबियांवर शोककळा

Dombivli MIDC Blast : डोंबिवलीतील अतिधोकादायक रासायनिक कंपन्यांचे कायमस्वरूपी स्थलांतर करणार; स्फोटानंतर खासदार शिंदेंची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT