Farm laborers cutting eggplants of the indigenous Raviya variety in the field of young farmer Pradeep Ahire. Neighboring farmer Pradeep Ahire. esakal
नाशिक

Success: वांगे, पपईने दिली लाखमोलाची साथ! जिद्द, चिकाटीच्या जोरावर ब्राह्मणगावच्या युवा शेतकऱ्याच्या प्रयत्नांना फळ

राकेश शिरुडे

ब्राह्मणगाव : जिद्द व चिकाटीच्या जोरावर नियोजनबद्ध शेती केल्यास उत्तम प्रकारे शेती पिकाचे उत्पादन घेता येते. त्यासाठी वेगळे प्रयोग करण्याची व श्रमाची तयारी हवी, हेच जणू काही ब्राह्मणगाव (ता. बागलाण) येथील युवा शेतकरी प्रदीप मधुकर अहिरे यांनी दाखवून दिले.

त्यांनी आपल्या एक एकर क्षेत्रात वेलकम ४६ जातीची पपई व दोन एकर क्षेत्रात देशी रवय्या जातीच्या वांग्याची लागवड केली. प्रभावीपणे फळपीक व्यवस्थापन करून लाखो रुपयांचे उत्पादन घेतले आहे. (efforts of young farmer of Brahmangaon success due to strength of determination and perseverance Success nashik)

दोन वर्षांपूर्वी पितृछत्र हरपल्यानंतर शेतीची जबाबदारी प्रदीप अहिरे यांच्यावर आली. कांदा व टोमॅटोला मिळणारा कवडीमोल बाजारभाव यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. त्यातच मजुरांची वाढती मजुरी, मजूर शोधासाठीची धावपळ यामुळे शेतकरीराजा हैराण झाला.

या सर्वांना फाटा देत श्री. अहिरे यांनी देशी रवय्या वांगे व पपईची लागवड करायचे ठरवले. १ जानेवारीला ठिबक सिंचनाद्वारे एक एकर क्षेत्रात वेलकम ४६ जातीची पपई लागवड केली. त्याच क्षेत्राजवळील दोन एकर क्षेत्रात देशी रवय्या जातीचे वांग्याची लागवड १ जूनला केली.

यानंतर पपई व वांग्याकडे चांगले लक्ष दिले. उत्पादन सुरू झाल्यानंतर सध्या रोज ७० ते ८० क्रेट्स वांग्याचे उत्पादन होत आहे. पपईचे रोजचे उत्पादन ४० ते ५० क्रेट्स आहे. वांगे व पपई तोडण्यासाठी दहा ते बारा मजूर लागतात.

लागवड, व्यवस्थापन, मजुरी, बी यांसह झालेला खर्च निघून देशी रवय्या वांग्याच्या उत्पादनातून पाच लाख रुपये, तर पपईच्या उत्पादनातून दोन लाख रुपये मिळतील, असे अपेक्षित असल्याचे श्री. अहिरे यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

ब्राह्मणगाव परिसरात अनेक शेतकरी कांदा पिकाची लागवड करतात. कांद्याला मिळणारा बाजारभाव व मजुरांची टंचाई, मजुरांची विनवणी पाहता त्याला फाटा देत युवा शेतकरी प्रदीप अहिरे यांनी देशी रवय्या जातीचे वांग्याची लागवड व वेलकम ४६ जातीचे पपईची लागवड करून लाखो रुपयांचे उत्पादन घेतले आहे.

देशी रवय्या जातीच्या वांग्याची गुजरातमध्ये जास्त मागणी आहे. साधारणतः ५० रुपये किलो दराने ही वांगे तेथील बाजारात विक्रीला पाठविले जातात. पपई गोड असल्याने व त्यात एकही बी नसल्याने पपईची मागणी वाढली आहे.

१२ ते १५ रुपये किलो दराने पपईची विक्री होत आहे. त्यांच्या या वेगळ्या प्रयोगाचे अनेक शेतकऱ्यांनी कौतुक केले आहे.

वांगे लागवड खर्च - एक लाख रुपये

वेलकम ४६ जातीचे पपई - एक लाख रुपये

मिळणारा बाजारभाव

देशी रवय्या वांगे - ५० ते ६० रुपये किलो

पपई - १२ ते १५ रुपये किलो

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cyclone Shakti: शक्ती चक्रीवादळ कुठे पोहोचले? धोका नेमका कधी टळणार? हवामान खात्याकडून तारीख जाहीर

Ramdas kadam : रामदास कदम यांचा आणखी एक खळबळजनक दावा, थेट उद्धव ठाकरेंना आव्हान

Crime News : गोळीबार प्रकरण: पंचवटी पोलिसांकडून १४वा संशयित जेरबंद, आतापर्यंत माजी नगरसेवकासह १४ अटकेत

World Cup 2025: भारताविरुद्ध पाकिस्तानने टॉस जिंकला, प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल; हस्तांदोलन झालं की नाही?

Sangli Accident Death : काम संपवून घरी निघाला होता, समोरू दुचाकी आली अन् दोघेही जाग्यावर संपले; सांगलीतील घटना

SCROLL FOR NEXT