Boiled Egg esakal
नाशिक

ऐन थंडीत ग्राहकांच्या खिशाला कात्री; वाढले अंड्यांचे दर | Nashik

अमोल खरे

मनमाड (जि. नाशिक) : सध्या थंडीचा कडाका वाढत असल्याने पौष्टिक खाण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. त्यामुळे सर्वांच्याच खाण्यातील पौष्टीक खाद्य असलेल्या अंड्यांचे भावही कडाडले आहेत. ३० अंड्याच्या एका ट्रेचे दर १६० रुपये, तर गावठी अंड्याचा ट्रे ३०० रुपयांपर्यंत वाढले आहे. त्यामुळे ऐन थंडीत सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागत आहे.

ऐन थंडीत ग्राहकांच्या खिशाला कात्री

सर्वसामान्यांच्या खाण्यातील पौष्टीक खाद्य म्हणजे अंडी. मात्र, ही अंडी थंडीमुळे आता महाग होऊ लागली आहेत. आता ऐन मोसमात महाग झाली आहेत. अंडी ही उष्ण आणि अधिक प्रमाणात प्रोटिन्स देणारी असतात. त्यामुळे साधारणपणे या काळात अंड्यांच्या मागणीत वाढ होते. काही दिवसांपासून थंडी वाढल्याने शरीरात ऊर्जा निर्माण व्हावी, याकरीता अंडी खाण्याचे प्रमाण वाढवले होते. पण, थंडीमुळे अंडी महागल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसणार आहे. थंडीच्या दिवसात अंड्यांची मागणी वाढल्याने घाऊक विक्रेत्यांकडे अंड्यांचे दरही वाढले आहेत. शहरातील घाऊक विक्रेत्यांकडे येणारी अंडी ही मुख्यत्वे हैद्राबाद, आंध्र प्रदेश आणि नाशिक जिल्ह्यातून येत असतात. शहरातील घाऊक विक्रेत्यांकडे अंड्यांचे दर हे १३० रुपयांपर्यंत होते. मात्र, हेच दर सध्या १६० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. ३० अंड्याचा ट्रे १६० रुपयांना असून, किरकोळ विक्रेत्यांकडे अंड्याचा ट्रे १८० रुपये दराने विक्री केला जात आहेत. त्यामुळे एक अंडे सहा रुपयांना मिळत आहे. तर गावठी अंड्याचा ट्रे ३०० रुपयाला असून, एक अंडे १० रुपये दराने विकले जात आहे.

डिझेल दरवाढीचाही फटका

पुढील दिवसात शहराच्या तापमानात घसरण होऊन अंड्यांची मागणी वाढल्यास सध्याच्या अंड्यांचे दर वाढण्याची शक्यता आहे. डिसेंबरच्या सुरवातीपासून शहरात गारठा जाणवू लागल्याने अंड्यांना ग्राहकांची मागणी वाढली आहे. डिझेलच्या दरवाढीमुळे अंड्याचे भाव वधारले आहेत, असा दावा विक्रेते करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder 5 KG पाच किलो एलपीजी सिलिंडरबाबत नवा नियम, खरेदीसाठी ओळखपत्र बंधनकारक

बारामतीत काँग्रेसनं उमेदवारी दिलेले आकाश मोरे कोण? अजित पवारांच्या विरोधात डिपॉझिट झालेलं जप्त

RCB vs CSK: अरे काय केलं... विराट कोहलीचा शिवम दुबेने एकदम सोपा कॅच सोडला; अनुष्का शर्माही शॉक; Video Viral

अल्पवयीन बहिणींच्या लग्नाचा घाट, पोलिसांसह अधिकाऱ्यांनी रोखला बालविवाह

IPL 2026: १९ षटकार... टीम डेव्हिडची वादळी फटकेबाजी, पडिक्कलचीही फिफ्टीच; CSK विरुद्ध RCB च्या अडीचशे धावा पार

SCROLL FOR NEXT