Shiv Sena esakal
नाशिक

एक हाती कारभाराचा मनसे पॅटर्न शिवसेनेच्या मुळावर

महेंद्र महाजन

नाशिक : नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडाच्या झेंड्यानंतर नाशिक ते थेट राजधानी मुंबईतील राजकीय घडामोडींचे विश्‍लेषण सुरु झाले. राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या नाशिक महापालिकेतील (NMC) सत्तेच्या काळात कामांचा धडाका उडाला होता. मात्र त्या कामांचे श्रेय राज यांना का मिळाले नाही? त्याचे कारण म्हणजे, त्यांनी जबाबदारी सोपविलेले पक्षाला सोडून गेले. आताही तशीच गत शिवसेनेची (Shiv sena) झालीय. विधिमंडळ गटनेता, नगरविकासमंत्री आणि सोबत आमदारांना सांभाळणे अशा महत्त्वाच्या जबाबदारी दिलेले श्री. शिंदे यांनी मुंबई सोडून आपल्या समर्थक आमदारांसोबत थेट सूरत गाठले. (Eknath Shindes rebellion started political developments from Nashik to Mumbai Maharashtra political news)

नाशिकमध्ये शिवसेनेचे राजकारण आणि संघटन असे दोन वेगवेगळे भाग राहिल्याचे आजवरच्या वाटचालीवरून पाहावयास मिळते. त्यामुळे महापालिकेतील सत्ता असो, की आमदार आणि खासदार हे एकीकडे आणि संघटनात्मक बांधणी एकीकडे अशी राजकीय वाटचाल शिवसेनेची राहिली आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे आगामी काळात शहर आणि जिल्ह्याच्या राजकारणावर पुन्हा पकड घट्ट करायची असल्यास संघटनात्मक बांधणी करत असताना दुसरीकडे सामान्य कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्‍वास वाढवावा लागेल, असे पक्षाच्या राजकीय वाटचालीत योगदान देणाऱ्यांना वाटते आहे. शिवसेनेतील फेरबदलांमध्ये संघटनेचे ऐकले गेले नसल्याचे काय किंमत मोजावी लागले, याकडे पक्षांतर्गत अंगुलिनिर्देश करण्यात येत आहे. देवळाली, सिन्नर, इगतपुरी, दिंडोरी, निफाड मतदारसंघात पक्षाला फटका बसला.

त्यामुळे नांदगावचे सुहास कांदे आणि मालेगाव बाह्यचे कृषीमंत्री दादा भुसे यांच्यावर पक्षाला समाधान मानावे लागले. त्याचवेळी आगामी महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या तोंडावर राजकीय गदारोळ उडाला असला, तरीही महाविकास आघाडीमध्ये सहभागी असलेल्या पक्षांमधील ज्येष्ठांच्या म्हणण्यानुसार कर्नाटक, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेशहून महाराष्ट्राचे राजकारण वेगळे असल्याने गोंधळ घालणाऱ्यांना त्याची किंमत चुकवावी लागेल.

‘हनुमान चालिसा‘ने जागृकता

राजकीय पक्ष सत्तेत दाखल झाल्यावर संघटनात्मक पातळीवर मरगळ ठरलेली असते. मध्यंतरी हनुमान चालिसा पठणाचा ‘इपिसोड' तयार झाला असताना विशेषतः शिवसेनेत जागृकता वाढीस लागल्याचे मानले जाते. आताही मुंबईसह राज्याच्या विविध भागात कार्यकर्त्यांनी रस्त्यावर येऊन मुख्यमंत्र्यांना दिलेले समर्थन त्याचे प्रतीक असल्याचे दिसते. एवढेच नव्हे, तर आताच्या राजकीय गदारोळात विधानसभेच्या सभापतींकडे खातरजमा करण्यासाठी आमदारांना बोलवावे लागेल. अशावेळी कार्यकर्ते जागेवर असल्याने राजकीयदृष्ट्या पळता भुई थोडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बंडातून स्थानिक काय शिकलेत?

शिवसेनेच्या आजवरच्या बंडातून स्थानिक कार्यकर्ते आणि पदाधिकारी काय शिकलेत हेही महत्त्वाचे आहे. पालकमंत्री छगन भुजबळ आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ‘जय महाराष्ट्र’ केल्यावर पक्षाला धक्का बसला. मात्र गणेश नाईक आणि राज ठाकरे यांनी ‘जय महाराष्ट्र’ केल्यावर पक्षाच्या संघटनात्मक बांधणीला धक्का बसला नव्हता. या आठवणींना आता उजाळा दिला जात आहे. शिवाय एकनाथ शिंदे यांच्या भविष्यातील भूमिकेनंतर काय स्थिती राहील, यासंबंधीच्या तर्कवितर्कांना शिवसेनेत उधाण आले आहे.

कार्यकर्त्यांच्या चष्म्यातून नेतृत्वाचे गुण

० बाळासाहेब ठाकरे : ‘पब्लिक डिमांड' याची नाडी ओळखून पक्षाच्या संघटनात्मक संकल्पनेची रचना करायचे

० उद्धव ठाकरे : पक्षामध्ये कार्यकर्त्याला काय वाटते आणि काय हवे यास दिले गेले प्राधान्य

० राज ठाकरे : पक्षाला काय हवे आणि आपण म्हणेल तसे कसे घडेल हे महत्त्वाचे मानले गेले

"मुख्यमंत्री स्वतःकडे नगरविकासमंत्रीपद ठेवायचे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तसे केले नाही. खरे म्हणजे, विस्थापितांना शिवसेनेत राजकारणात प्रस्थापित केल्याचे हजारो उदाहरणे आहेत. असे असताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मुलगा उद्धव ठाकरे यांना पाच वर्षे मुख्यमंत्री पदी का पाहवत नाही? असा सामान्य कार्यकर्त्यांना भेडसावणारा प्रश्‍न आहे."

- जयंत दिंडे, माजी जिल्हाप्रमुख (ग्रामीण)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

Rabri Devi Statement : तेजप्रताप यादव प्रकरणावर पहिल्यांदाच राबडी देवींनी सोडलं मौन अन् जाहीर कार्यक्रमात, म्हणाल्या...

SCROLL FOR NEXT