नाशिक

कळवण तालुक्यात २५ हजार ११३ लाभार्थ्यांची ई-केवायसी प्रलंबित ‘मेरा ई-केवायसी’द्वारे घरबसल्या पडताळणीची सुविधा

CD
ॲंकर पंचवीस हजार लाभार्थ्यांची ई-केवायसी प्रलंबित कळवण तालुक्यात ई केवायसी करण्याचे आवाहान कळवण ता.२७ सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब योजनेतील अनुदानित धान्याचा लाभ सुरू ठेवण्यासाठी शिधापत्रिकेतील प्रत्येक सदस्याची ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे. कळवण तालुक्यात अद्याप २५ हजार ११३ लाभार्थ्यांची ई-केवायसी प्रलंबित असून, संबंधित लाभार्थ्यांनी ही प्रक्रिया लवकर पूर्ण करण्याची गरज आहे. शिधापत्रिकेतील लाभार्थ्यांची ओळख निश्चित करण्यासाठी ई-केवायसी करण्यात येत आहे. पडताळणी अपूर्ण राहिल्यास अनुदानित धान्याच्या लाभात अडचणी निर्माण होण्याची शक्यता असल्याने लाभार्थ्यांनी विलंब टाळावा. रास्त भाव दुकानांमध्ये ई-पॉस यंत्राद्वारे ही प्रक्रिया पूर्ण करता येते. वृद्ध, आजारी तसेच कामानिमित्त बाहेरगावी असलेल्या लाभार्थ्यांना रास्त भाव दुकानात प्रत्यक्ष जाणे शक्य होत नाही. अशा लाभार्थ्यांसाठी ‘मेरा ई-केवायसी’ ॲपच्या माध्यमातून मोबाईलवर घरबसल्या पडताळणी करण्याची सुविधा उपलब्ध आहे. चेहरा पडताळणी तंत्रज्ञानाच्या साहाय्याने लाभार्थ्यांना स्वतःची ई-केवायसी पूर्ण करता येते. चौकट घरबसल्या ई-केवायसी लाभार्थ्यांनी मोबाईलमध्ये ‘मेरा ई-केवायसी’ ॲप डाउनलोड करून शिधापत्रिका व आधार क्रमांकासंबंधी आवश्यक माहिती नोंदवावी. त्यानंतर ॲपमधील सूचनांनुसार चेहरा पडताळणीची प्रक्रिया पूर्ण करावी. पडताळणी यशस्वी झाल्यानंतर ई-केवायसीची नोंद डिजिटल प्रणालीत केली जाते. मोबाईलवर प्रक्रिया पूर्ण करताना अडचण आल्यास संबंधित रास्त भाव दुकानाशी संपर्क साधून ई-केवायसी करून घेता येईल. कुटुंबातील एकाही पात्र सदस्याची पडताळणी प्रलंबित राहणार नाही, याची शिधापत्रिकाधारकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. चौकट आकडे बोलतात... कएकूण लाभार्थी — १,६२,२२९ ई - केवायसी पूर्ण — १,३७,११६ बाकी — २५,११३ कोट- "कळवण तालुक्यात २५ हजार ११३ लाभार्थ्यांची ई-केवायसी प्रलंबित आहे. संबंधित लाभार्थ्यांनी आपल्या रास्त भाव दुकानात जाऊन किंवा ''मेरा ई-केवायसी'' अॅपच्या माध्यमातून ही प्रक्रिया लवकर पूर्ण करावी. अनुदानित धान्याचा लाभ मिळण्यात अडचण येऊ नये, यासाठी शिधापत्रिकेतील प्रत्येक सदस्याची ई-केवायसी पूर्ण केल्याची खात्री करावी." विशाल धुमाळ (पुरवठा अधिकारी, कळवण)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prashant Kishor: प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या डिजिटल मीडिया प्रमुखांचा आढळला मृतदेह; चालत्या ट्रेनमधून झाले होते बेपत्ता

Water Crisis : हक्काचे पाणी उपसले; गावाला शासकीय टँकरची प्रतीक्षा! करजगावच्या पाझर तलावाने गाठला तळ

Latest Marathi News Live Update : पहिल्या फेरीत सेनेच्या किरण सरनाईक यांची आघाडी; काँग्रेसच्या अदिती पोहरे चौथ्या स्थानावर

Pakistan vs Sri Lanka: पाकिस्तानची घरच्या मैदानावर दाणादाण! श्रीलंकेने ११० धावांत गुंडाळलं, मदुशंकाचा पंजा अन् थेट फायनलमध्ये धडक

Palghar News : पालघर रुग्णालय राडा प्रकरण, ११ गोविंदांसह कॅमेरामनला जामीन; प्रमुख आरोपींच्या अर्जांवर सुनावणी बाकी

SCROLL FOR NEXT