पान चार ॲंकर
-------------------
31762
नंदुरबार : कार्यशाळेस उपस्थित धनंजय गोगटे, संतोष पावले, प्रमोद शिंदे, नंदकुमार पैठणकर, यशवंत ठाकूर, गिरीश चौधरी आदी.
‘एल निनो’मुळे शेती क्षेत्रावर गंभीर परिणाम
धनंजय गोगटे : बाधित शेतकऱ्यांना कर्ज सुविधा देण्याचे आदेशांचे पालन करावे
सकाळ वृत्तसेवा
नंदुरबार, ता. ९ : यावर्षी ''एल निनो'' च्या प्रभावामुळे शेती क्षेत्रावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत बाधित शेतकऱ्यांना सकारात्मक पद्धतीने बँकिंग आणि कर्ज सुविधा पुरवणे ही बँकांची जबाबदारी आहे. तसेच थकीत कर्जाच्या वसुली प्रक्रियेबाबत राज्य शासनाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचना व आदेशांचे सर्व बँकांनी काटेकोरपणे पालन करावे, असे निर्देश अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांनी दिले.
नंदुरबार येथे नाबार्डतर्फे वरिष्ठ बँकर्स कार्यशाळा झाली. यावेळी कृषी वित्तपुरवठा आणि हवामान आव्हाने यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी श्री. गोगटे बोलत होते. कार्यशाळेस जिल्हा परिषदेचे लेखा अधिकारी संतोष पावले, अग्रणी बँकेचे जिल्हा व्यवस्थापक नंदकुमार पैठणकर, ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेचे संचालक प्रमोद शिंदे, जिल्हा अभियान अधिकारी यशवंत ठाकूर, आणि जिल्हा उद्योग केंद्राचे गिरीश चौधरी उपस्थित होते. कार्यशाळेला नंदुरबार जिल्ह्यातील विविध बँकांचे ४० पेक्षा अधिक जिल्हा समन्वयक, शाखा व्यवस्थापक उपस्थित होते.
नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक रवींद्र पी. मोरे यांनी किसान क्रेडिट कार्डच्या व्याप्तीबाबत सादरीकरण केले. नियमित शेतकऱ्यांसोबतच वनहक्क धारक, पशुपालक, शेळीपालन आणि मत्स्यपालन करणाऱ्या घटकांना क्रेडिट कार्ड प्रणालीशी जोडण्याचे आवाहन त्यांनी केले. शेती क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठी ॲग्री ड्रोन, पॉवर टिलर, शेतकरी उत्पादक संस्था आणि बचत गटांना पतपुरवठा करण्याच्या विविध संधींवर त्यांनी प्रकाश टाकला.
बँकर्सना मार्गदर्शन करताना धनंजय गोगटे म्हणाले की, या वर्षी ''एल निनो''चा शेती क्षेत्रावर परिणाम होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत बाधित शेतकऱ्यांना बँकिंग आणि कर्ज सुविधा पुरवणे ही बँकांची जबाबदारी आहे. थकीत कर्जाच्या वसुली प्रक्रियेबाबत राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचना व आदेशांचे बँकांनी काटेकोरपणे पालन करावे, असे निर्देश त्यांनी दिले.
महिला बचत गटांचे पतजोडणी उद्दिष्ट यशस्वीरीत्या पूर्ण केल्याबद्दल यशवंत ठाकूर यांनी बँकर्सचे अभिनंदन केले. गिरीश चौधरी यांनी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अंतर्गत पात्र उपक्रम, व्यवसाय आणि त्यासंबंधीच अर्जांच्या प्रक्रियेविषयी बँकर्सना माहिती दिली. संतोष पावले यांनी बँकर्सना जोखीम निवारणाबाबत मार्गदर्शन केले. नंदकुमार पैठणकर यांनी सीएमईजीपी अंतर्गत येणाऱ्या प्रकरणांना बँकांनी सर्वोच्च प्राधान्य देऊन सर्व प्रलंबित अर्ज त्वरित निकाली काढण्याचे निर्देश दिले. ''युथ कनेक्ट'' योजनेची माहिती दिली. प्रमोद शिंदे यांनी कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांची रूपरेषा सादर केली.
सूत्रसंचालन प्रा. बैसाणे यांनी केले. तुषार सेओलकर यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.