नाशिक

पाणीटंचाई, घटलेल्या पेरण्यांमुळे थंडीचा प्रभाव घटणार

CD
पाणीटंचाई, घटलेल्या पेरण्यांमुळे थंडीचा प्रभाव घटणार ‘एल निनो’चा प्रभाव; किमान-कमाल तापमानातील तफावत राहणार कायम सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १८ : यंदाच्या हिवाळ्यात जिल्ह्यात कडाक्याच्या थंडीचा कालावधी कमी राहण्याची शक्यता आहे. ‘एल निनो’चा प्रभाव, जमिनीतील घटलेला ओलावा आणि रब्बी हंगामातील पेरण्यांमध्ये झालेली मोठ्या प्रमाणावरील घट यामुळे यंदा थंडीची तीव्रता घटण्याची शक्‍यता आहे. किमान व कमाल तापमानात तफावतदेखील कायम राहणार आहे. सध्या नोव्हेंबर महिन्यात नाशिकचे किमान तापमान १० ते १२ अंश सेल्सिअसच्या दरम्यान स्थिर आहे. मात्र, दिवसा आणि रात्रीच्या तापमानात मोठी तफावत जाणवत आहे. रात्री गारवा असला, तरी दुपारी ३० ते ३२ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान जाऊन उन्हाचे चटके बसत आहेत. यंदा ऑक्टोबर महिन्यातही मागील दहा वर्षांच्या सरासरीपेक्षा तीन ते चार अंशांनी अधिक म्हणजेच ३५ अंश सेल्सिअसपर्यंत तापमानाची नोंद झाली होती. हीच उष्णता पुढील महिन्यांतही काही प्रमाणात जाणवण्याची शक्यता आहे. दर वर्षी रब्बी हंगामात बागायती क्षेत्राचे प्रमाण जास्त असल्याने जमिनीत ओलावा टिकून राहतो. थंडीचा कडाका वाढतो. मात्र, यंदा पाण्याअभावी गहू, हरभरा आणि मका यांसारख्या रब्बी पिकांच्या पेरण्या अत्यंत कमी झाल्या आहेत. जमीन उघडीबोडकी राहिल्याने थंडीची तीव्रता कमी राहणार आहे. पावसाळ्यात आणि परतीच्या पावसावर ‘एल निनो’चा प्रभाव दिसून आला होता. हा प्रभाव हळूहळू कमी होण्याच्या मार्गावर असला तरी जानेवारी-फेब्रुवारीपर्यंत त्याचे परिणाम जाणवत राहतील, असेही तज्‍ज्ञांचे म्‍हणणे आहे. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात उन्हाचा चटका नेहमीपेक्षा जास्त तीव्र नसेल, तरीही पाणीटंचाई आणि दुष्काळसदृश परिस्थितीमुळे उन्हाची तीव्रता अधिक जाणवेल. त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांनी उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन करून त्याचा अपव्यय टाळावा, तसेच कमी पाण्यात येणारी पिके घ्यावीत, असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'माझ्याशी स्पर्धा करायची असेल तर ४ हजार किमी चालावं लागेल'; राहुल गांधींनी नेमका कुणाला लगावला टोला? वाचा...

Killedharur News : कृषी उत्पन्न बाजार समितीतील ३१ भूखंडाची लिलावा प्रक्रिया पारदर्शक व्हावी; संचालक संदीप शिनगारे यांचे सलग दुसऱ्या दिवशी आमरण उपोषण सुरू

Andaman Festival : लोणी काळभोरच्या देवयानी ननवरेने अंदमानमध्ये गाजवला नृत्यकलेचा ठसा; आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक महोत्सवात प्रथम क्रमांक

Pachod News : तब्बल ४८ तासानंतर आर्यन उर्फ आयुषचा मृतदेह आढळला; श्यामचा शोध सुरूच..!

Donald Trump: ऐतिहासिक भेट! चीनमध्ये पहिल्यांदाच एकत्र आले ट्रम्प, पुतिन अन् शी जिनपिंग; बैठकीत काय चर्चा होणार?

SCROLL FOR NEXT