नाशिक

तोतया पोलिसांकडून वृद्ध दाम्पत्यास गंडा

CD
तोतया पोलिसांकडून वृद्ध दाम्पत्यास गंडा पुढे खून झाल्याचे सांगून दागिने उतरवले अन् दोघे पसार सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता.१४ : स्वतःला पोलिस असल्याचे भासवून दोघांनी म्हसावद रेल्वेगेट ते पाथरी दरम्यान वयोवद्ध दाम्पत्यास गाठले. पुढे खून झाला आहे, तुम्ही दागिने काढून ठेवा, असे सांगत दाम्पत्याच्या अंगावरील ९० हजारांचे दागिने काढून घेत दोघे पसार झाले. ही घटना बुधवारी (ता. १३) घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेल्वे विभागातून निवृत्त झालेले वसंतराव सीताराम पाटील (वय ६७, रा. म्हसावद, ता. जळगाव) हे दुचाकीने पत्नीसह पाथरी येथे जात होते. त्या वेळी म्हसावद रेल्वे गेटच्या पुढे गेल्यानंतर दोन जणांनी त्यांना थांबवले व आम्ही पोलिस असल्याचे सांगितले. पुढे दागिन्यांसाठी पती-पत्नीचा खून झाला असून तुम्ही तुमचे दागिने काढून ठेवा. त्यानुसार त्यांनी पाटील यांच्याजवळील रुमाल घेऊन त्यांना त्यात दागिने ठेवण्यास सांगितले. महिलेने दीड तोळ्याची मंगलपोत, ५ ग्रॅम वजनाचे कानातील टॉप्स, ५ ग्रॅमची अंगठी रुमालात ठेवली. चौकट दागिने गायब या तोतया पोलिसांनी रुमालातील दागिने हातचलाखीने काढून घेत फक्त रुमाल दाम्पत्याच्या दुचाकीच्या डिक्कीत ठेवला. काही अंतरावर गेल्यानंतर महिलेला शंका आल्याने दागिने पाहिले असता रुमालात दागिने गायब होते. या प्रकरणी वसंतराव पाटील यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस नाईक ईश्वर लोखंडे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladakh Development Boost : लडाखला ३,३५० कोटींच्या विकास प्रकल्पांची भेट! पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लेह विमानतळासह सामरिक रस्त्याचे लोकार्पण

IND vs WI, 4th T20I: शे होपची बॅट पुन्हा तळपली, ठोकलं ५० चेंडूत शतक; भारताला विजयासाठी पार करावं लागणार विक्रमी टार्गेट

Maharashtra Live News : उल्हासनगर रेल्वे स्टेशनबाहेर थरार; डोक्यात दोन गोळ्या झाडून हरीश गजवानी यांची भररस्त्यात हत्या

Pune News : खासगी सावकारीच्या त्रासाला कंटाळून तरुणाने संपविले जीवन; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

BCCI Chief Selector: अजित आगरकरची जागा कोण घेणार? पार्थिव पटेलचा मोठा निर्णय अन् शर्यतीत ट्विस्ट

SCROLL FOR NEXT