नाशिक

सत्य आणि ईश्वर हीच जीवनाची मूळ तत्वे :

CD
YEO26B26980 येवला : ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त कार्यक्रमात सहभागी ज्येष्ठ नागरिक. ----------------- ३६-३ सत्य आणि ईश्वर हीच जीवनाची मूळ तत्त्वे नीता दीदी यांचे प्रतिपादन ः येवल्यात ज्येष्ठ नागरिक दिन साजरा सकाळ वृत्तसेवा येवला, ता. ९ : सत्य आणि ईश्वर हीच जीवनाची मूळ तत्त्वे आहेत. जय जवान, जय किसान हे दोन मंत्र आजही आपल्याला प्रेरणा देतात. हाच पवित्र संदेश आपण पुढच्या पिढीला दिला पाहिजे. संयम, शांती, अध्यात्म आणि लोभ विरहित जीवन जगल्यानेच माणसाला खरे आणि आनंदी जीवन जगता येते, असे प्रतिपादन ब्रह्मकुमारी नीता दीदी यांनी केले. येथील श्रीराम ज्येष्ठ नागरिक संघातर्फे स्थानिक सरसेनापती उमाबाई दाभाडे सभागृहात महात्मा गांधी जयंती, लालबहादूर शास्त्री जयंती, संत ज्ञानेश्वर जयंती आणि ज्येष्ठ नागरिक दिनाच्या एकत्रित कार्यक्रमाप्रसंगी त्या बोलत होत्या.ज्येष्ठांचे मनोबल वाढविण्यासाठी त्यांनी ‘वय वाढते तसा उत्साहही वाढतो, हेच ज्येष्ठत्वाचे खरे रहस्य असल्याचे सांगितले. अध्यक्षस्थानी रावसाहेब दाभाडे होते. सरचिटणीस कृष्णाजी शिंदे, नारायण (मामा) शिंदे, तालुकाध्यक्ष गुमानसिंग परदेशी, सीताराम निकुंभ, सूरजमल करवा, डॉ. विलास दाभाडे, किशोर कुमावत आदी उपस्थित होते. प्रारंभी दिवंगत सभासदांना श्रद्धांजली वाहत ‘खरा तो एकची धर्म’ या प्रार्थनेने सुरुवात करत मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. ज्येष्ठ नागरिक नंदलाल भांबारे, प्रल्हाद कोतवाल यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला. कृष्णा शिंदे यांनी प्रास्ताविक केले. सीताराम निकम यांनी परिचय करून दिला. गुमानसिंग परदेशी यांनी सूत्रसंचालन केले. अशोक परदेशी, प्रतापराव देशमुख, वसंत सुतार, ज्ञानेश्वर भुजबळ, दिनकर संभेराव, पुंजाराम कदम, मुरलीधर जाधव, सुंदरलाल वाघ, शशिकांत मालपुरे, चंद्रकांत हिवाळे, मधुकर भारती, श्याम बागूल, प्रमोद आमोदकर, नामदेव कोल्हे, प्रभाकर पवार, त्र्यंबक शिखरे, शिवाजी लोणारी आदी उपस्थित होते. ---------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Drought News : राज्यातील आणखी १८ तालुक्यात दुष्काळ?, पिकांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश; सांगली जिल्ह्यातील दोन तालुक्यांचा समावेश

IND vs WI 2nd T20I: अभिषेक शर्माला जगात भारी बनण्याची संधी; सूर्यकुमारचा वर्ल्ड रेकॉर्ड निशाण्यावर, बाबरचाही विक्रम करणार उद्ध्वस्त

फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये १० हजारांहून अधिक धावा; भारतात जन्मलेल्या या क्रिकेटपटूने ठोकला क्रिकेटला रामराम! पार्थिवसोबतही केलंय ओपनिंग!

Maharashtra Live News : गोवा एक्स्प्रेसमधून ५० विद्यार्थी ताब्यात

थकलेला चेहरा, डोक्यावर टक्कल, छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकेच्या हिरोची ही अवस्था, तुम्ही ओळखलंत का?

SCROLL FOR NEXT