नाशिक

वृद्धाच्या मृत्यूप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा

CD
वृद्धाच्या मृत्यूप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. २६ ः अजनाळे (ता. धुळे) येथे मोबाईलवरून खोटे आमिष दाखवून, विश्वास संपादन करत वृद्धाकडून एक लाख रुपये घेतल्याचा प्रकार घडला. या प्रकारामुळे मानसिक त्रासातून विष्णुपंत दामोदर देवडे यांनी १० ऑक्टोबरला विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली, तसेच पैसे परत मागण्यासाठी गेलेल्या त्यांच्या पुतण्याला मारहाण करून २२ हजार रुपये घेतल्याप्रकरणी चार संशयितांविरुद्ध धुळे तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. मंचक रामेश्वर देवडे (रा. हातगाव, ता. घनसावंगी, जि. जालना) यांच्या फिर्यादीनुसार, विष्णुपंत यांच्याशी घटनेच्या दहा ते १५ दिवस आधी मोबाईलवरून एका व्यक्तीने संपर्क साधला होता. संशयितांनी खोटे आमिष दाखवून त्यांचा विश्वास संपादन केला आणि एक लाख रुपये घेतले. त्यामुळे व्यथित झालेल्या विष्णुपंत यांनी राहत्या घरी विषारी औषध प्राशन केले. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. पैसे परत मागण्यासाठी मंचक देवडे मित्रांसह अजानाळे येथे गेले असता, संशयितांनी त्यांना शिवीगाळ व दमदाटी केली, तसेच हाताबुक्क्यांनी मारहाण करून त्यांच्याकडील २२ हजार रुपये घेतले. विक्रम अनिल पवार, अर्वेश अरविंद भोसले, संदीप मिथुन पवार आणि विकास सुनील पवार (सर्व रा. अजनाळे) अशी संशयितांची नावे आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sayaji Shinde on Bhimashankar project : "पर्यावरण नष्ट करायला तुम्हाला निवडून दिलंय का?"; कर्जत-भीमाशंकरमधील प्रकल्पावरून सयाजी शिंदे भडकले, १ लाख तरुणांची फौज उतरवण्याचा इशारा!

Manchar News : आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर महाराष्ट्राचा आवाज! मंचरचे जैव ऊर्जा तज्ञ ॲड. राहुल पडवळ यांचा नवी दिल्लीत आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर गौरव

Pune News : मध्यवर्ती पेठांमध्ये दिवसा मालवाहतुकीस बंदी; मालाची चढ-उतार करण्यास रात्री ११ ते सकाळी ९ या वेळेतच परवानगी

Ganja Smuggling : गांजाची तस्करी करणाऱ्या वाहतूक पोलिसाला तेलंगणात अटक

Pune News : पक्षकाराची सही, प्रतिज्ञापत्र नसल्याने पोटगीचा दावा फेटाळला; उत्पन्नाचा तपशीलही दिला नाही

SCROLL FOR NEXT