Satyabhama Gunjal esakal
नाशिक

Nashik News: विजेचा धक्का लागून वृद्ध महिलेचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : तालु्नयातील सुळेवाडी येथे पावसामुळे विजेच्या खांबावर उतरलेला विद्युत प्रवाह जवळच असलेल्या पत्र्याच्या शेडमध्येही उतरल्याने 65 वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि.28) सायंकाळच्या सुमारास घडली.

मात्र, घटनेनंतर अद्यापही वीज वितरणच्या अधिकारी व सेवकांनी घटनास्थळी येऊन समस्या दुर न केल्याने परिसरातील नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे. (Elderly woman dies due to electric shock Nashik News)

सत्यभामा रामकृष्ण गुंजाळ असे या मृत महिलेचे नाव आहे. गुंजाळ यांच्या घराजवळ असलेल्या वीजेच्या खांबावरुन घरासाठी वीज कने्नशन घेण्यात आले आहे. बुधवारी (दि.28) दुपारनंतर परिसरात पावसाची सुरुवात झाली.

त्यामुळे गुंजाळ यांच्या घराजवळ असलेल्या लोखंडी खांबावर विद्युत प्रवाह उतरला. त्या खांबावरुनच गुंजाळ यांच्या घरात कने्नशन देण्यात आलेल्या वीजेच्या ताराला सपोर्ट देण्यासाठी लावण्यात आलेल्या लोखंडी तारेतून विद्युत प्रवाह घरात उतरला.

घराला असलेल्या पत्र्याच्या कपाऊंडलामध्येही विद्युत प्रवाह उतरला होता. यावेळी सत्यभामा या कपाऊंडजवळ काम करण्यासाठी गेल्या असता त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला व त्या जमिनीवर कोसळल्या.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

यावेळी जवळून जाणाऱ्या दोन युवकांनी महिला का खाली पडल्या हे बघण्यासाठी जवळ गेले असता त्यांनाही विजेचा धक्का बसला. मात्र, सुदैवाने ते बचावले. त्या युवकांनी तात्काळ ग्रामस्थांना माहिती दिली. त्यांनंतर काहींनी खांबावरील विद्युत प्रवाह बंद करुन महिलेला तात्काळ उपचारासाठी सिन्नर येथील खाजगी रुग्णालयात हलवले.

तेथून अधिक उपचारासाठी नाशिकला हवलत असतानाच त्यांचा मृत्यू झाला. यानंतर शवविच्छेदन करुन नातेवाईंकाना महिलेचा मृतदेह सुपुर्द करण्यात आला. मात्र, या घटनेनंतर अद्यापही वीज वितरणच्या अधिकाऱ्यांनी व सेवकांनी घटनास्थळी येऊन कुठलीही पाहणी न केल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

वीज वितरणच्या भोंगळ कारभारामुळे महिलेला जीव गमवावा लागल्याने तात्काळ महिलेच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई मिळवून देण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राजभवनातील SRPF जवानाच्या मृत्यूला नवं वळण! महिला कॉन्स्टेबलशी वाद; प्रेमसंबंधाचे फोटो पतीला पाठवले नंतर... धक्कादायक माहिती समोर

Pune Palkhi Traffic Update: पालखी आगमनानिमित्त पुण्यातील मुख्य रस्ते गुरुवारी बंद! वाहतूक पोलिसांकडून पर्यायी मार्ग जाहीर

Latest Marathi News Update : संत एकनाथ महाराज पालखी प्रस्थान सोहळा सुरू

Afghanistan Cricketer: आजाराशी झुंज अखेर संपली! अफगाणिस्तानच्या माजी वेगवान गोलंदाजाचं निधन; क्रिकेटविश्वात शोककळा

राहुल द्रविडच्या दोन्ही पोरांनी मैदान गाजवले! अन्वयची भारतीय संघासाठी दमदार खेळी, तर थोरला समित महाराजा ट्रॉफीत चमकला

SCROLL FOR NEXT