Accident Sakal
नाशिक

Nashik Accident News: मॉर्निंग वॉक करताना वृद्धा दुचाकीच्या धडकेत ठार; भगूर रोडवर एकाच अपघातात मृत्यु

सकाळ वृत्तसेवा

Nashik Accident News : वडाळागाव - पाथर्डी रोडवर अज्ञात दुचाकीस्वाराने मॉर्निंग वॉक करणाऱ्या वृद्‌धेला धडक दिल्याने वृद्‌धा ठार झाली.

तर दुसऱ्या घटनेमध्ये नाणेगाव-भगूर रोडवर दुचाकीवरून पडल्याने ५० वर्षीय इसमाचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे. (Elderly woman killed in bike collision during morning walk Death one accident on Bhagur Road Nashik Accident News)

वडाळागाव-पाथर्डी रोडवर मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या ७० वर्षीय वृद्धा दुचाकीच्या धडकेत ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली. ताराबाई रतनलाल चौधरी (७०, रा. बालाजी अपार्टमेंट, गुरुगोविंद सिंग कॉलेजच्या मागे, इंदिरानगर) असे मयत वृद्धेचे नाव आहे.

हवालदार पी.एस. जगताप यांच्या फिर्यादीनुसार, गेल्या साेमवारी (ता.६) सकाळी साडेसात वाजेच्या सुुमारास त्या वडाळागाव-पाथर्डी रोडवर माँर्निंग वॉक करीत होत्या. त्या सम्राट हॉटेलसमोर असताना अज्ञात दुचाकीस्वाराने त्यांना धडक दिली.

यात त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचार करून जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

तर, दुसरी घटना नानेगाव-भगूर रोडवर घडली. सुदास आसाराम उदावंत (५०, रा. नाणेगाव, ता.जि. नाशिक) हे गेल्या शनिवारी (ता.४) रात्री दुचाकीवरून नाणेगावकडून भगूरकडे जात होते.

त्यावेळी रामबाग याठिकाणी ते दुचाकीवरून खाली पडल्याने त्यांच्या डोक्यास गंभीर मार लागला. उपचारसाठी घोटी येथील एसएमबीटी रुग्णालयात दाखल केले.

त्यानंतर जिल्हा रुग्णलयात दाखल केले असता, वैद्यकीय अधिकार्यांनी तपासून मयत घोषित केले. यप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iranian Oil Tanker: होर्मुझ ओलांडल्यानंतर समुद्रात मोठा खेळ; भारताकडे निघालेल्या इराणी जहाजाचा यू-टर्न, चीनला जात आहे तेल

IAS transfer news : कोल्हापूर जिल्हाधिकारी, झेडपी सीईओ, महापालिका आयुक्तांची बदली; एकाच दिवशी धडाधड बदल्यांच्या आदेशाने चर्चांना उधाण

Konkan Mango Farmers : कोकणच्या हापूस उत्पादकांसाठी मोठी बातमी! राजू शेट्टींच्या मध्यस्थीनंतर व्यापाऱ्यांनी घेतला 'हा' निर्णय, वाशी APMC मधील बैठकीत काय ठरलं?

Latest Marathi News Live Update : मुंबई महापालिकेतील हजार कोटींच्या टेंडर्सवर मोठा निर्णय

Gas Cylinder Line : भर उन्हात नागरिकांच्या सिलिंडरसाठी रांगा; तुटवड्यामुळे ग्राहकांचे हाल, तब्बल ४६०० ग्राहकांची नोंदणी

SCROLL FOR NEXT