NSK26H31146
जळगाव : मतदार नोंदणी अधिकारी योगेशकुमार मीना यांना निवेदन देताना बीएलओ.
--------
निवडणूक आयोगाच्या अजब
कारभारामुळे ‘बीएलओ’ त्रस्त
------
मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडे तक्रार ; स्वखर्चाने सुटीच्या दिवशी काम
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता.२ : ‘एसआयआर‘च्या नावाने निवडणूक आयोगाचा अजब कारभार चालला आहे. त्यामुळे बीएलओंसह मतदारही त्रस्त झालेले आहेत. वर्षभरापासून ‘बीएलओ’ ‘एसआयआर’चे काम स्वखर्चाने रविवार व सार्वजनिक सुटीच्या दिवशीही करीत आहेत. विविध कारणांनी मतदार यादीतून मतदारांची नावे गायब झाल्यामुळे मतदार बीएलओ यांना जबाबदार ठरवीत आहेत. उल्लेखनीय म्हणजे निवडणूक आयोग व प्रशासन मात्र केवळ बीएलओ यांना आदेश देऊन मोकळे होत आहेत. इतकेच नाही, तर वेळेत काम न झाल्यास यांच्यावर गुन्हे दाखल करण्याच्या धमक्याही देत आहेत. अशा या दुहेरी संकटात बीएलओ सापडले असून, त्यांना ''तोंड दाबून बुक्क्यांचा मार'' सहन करावा लागत आहे. या त्रासाला कंटाळून त्यांनी विविध मागण्यांचे निवेदन येथील उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी आयएएस योगेशकुमार मीना यांच्याकडे सुपूर्द केले आहे. त्यांनी समस्या दूर करण्याचे आश्वासन दिले आहे. निवेदन देताना बीएलओ डॉ. आर. डी. कोळी, विमल पाटील, उज्ज्वला करकरे, डॉ. व्ही. एस. पाटील, आर. डी. पाटील, उमेश सूर्यवंशी, सुनील पवार, कोमल तायडे, रौनक तडवी यांच्यासह बीएलओ उपस्थित होते.
या आहेत प्रमुख मागण्या
‘एसआयआर’च्या कामानंतर नोव्हेंबरपासून बीएलओ यांना कामाची सक्ती न करता स्वेच्छेने कार्यमुक्ती द्यावी, जनगणनेप्रमाणे उन्हाळी सुट्टीत काम केलेल्या बीएलओ यांना मानधन देण्यात यावे, या काळातील रजा सेवा पुस्तकात वर्ग करण्यात यावी, रविवारी व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी कोणतेही काम लावण्यात येऊ नये, मतदार सुनावणीसाठी व नोटीस वाटपासाठी पूर्णवेळ कार्यमुक्त करण्यात यावे, मतदारांना सुनावणीसाठी केंद्रावर बोलविण्यात यावे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.