college esakal
नाशिक

महाविद्यालयामध्ये १५ पर्यंत निवडणूक साक्षरता मंडळ

महेंद्र महाजन

नाशिक : राज्यातील प्रत्येक महाविद्यालयांत १५ ऑगस्टपर्यंत निवडणूक साक्षरता मंडळ स्थापन करण्याचा निर्णय उच्च व तंत्रशिक्षण विभागाने घेतला आहे. ३१ ऑगस्टपर्यंत मंडळाचे नोडल अधिकारी महाविद्यालयातील शिक्षक व विद्यार्थी संपर्क प्रमुखांचे संपर्क मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडी जिल्हाधिकाऱ्यांकडे कळवायचा आहे. नोडल अधिकाऱ्यांनी मंडळातील विद्यार्थ्यांचा व्हॉट्सॲप अथवा टेलिग्रामवर स्वतंत्र गट तयार करायचा आहे. (Election-Literacy-Board-in-colleges-marathi-news-jpd93)

निवडलेले प्रतिनिधी, समितीकडे मंडळाचे कामकाज

मतदारांचे पद्धतशीर शिक्षण आणि निवडणूक सहभाग कार्यक्रमांतर्गत मंडळाची स्थापना राज्यातील अकृषी, अभिमत, स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठ परिसरात होईल. संलग्न असलेली महाविद्यालय, अभियांत्रिकी महाविद्यालय, तंत्रनिकेतन व तत्सम शिक्षण संस्थांमध्ये कुलगुरूंनी मंडळ स्थापन करण्याच्या सूचना द्यायच्या आहेत. निवडलेले विद्यार्थी प्रतिनिधी निवडणूक साक्षरता मंडळाची कार्यकारी समितीची स्थापना करतील. मंडळाच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवड केली जाईल. विद्यार्थी प्रमुख मंडळाचा संयोजक राहणार असून, नोडल अधिकारी त्याच्या कार्यामध्ये मदत करतील.

अशी करता येईल नोंदणी

महाविद्यालयातील १८ वर्षे पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांनी मतदार म्हणून नोंदणी केली आहे अथवा नाही याच्या नोंदी करायच्या आहेत. मंडळात सहभागी विद्यार्थ्यांना नोंदीसाठी प्रवृत्त करायचे आहे. विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश देताना, निकालाचे प्रमाणपत्र देताना त्यांनी नोंदणी करण्यास सांगायचे. विद्यार्थी https://www.nvps.nic.in या संकेतस्थळावर अथवा ‘व्होटर हेल्पलाइन ॲप’वरून ऑनलाइन नोंदणी करू शकतात. अथवा ते वास्तव्यास असलेल्या मतदार नोंदणी कार्यालयात नोंदणी करता येईल.

असे राबविणार उपक्रम

मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे होणाऱ्या विविध ऑनलाइन, ऑफलाइन स्पर्धांची माहिती नोडल अधिकाऱ्यांनी मंडळाच्या ग्रुपवर पाठवून स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांना सहभागी होण्यास प्रोत्साहित करायचे आहे. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून विविध ऑनलाइन स्पर्धा, राज्य स्पर्धा महोत्सव, वेबसंवाद-परिसंवाद, राष्ट्रीय युवादिन, राष्ट्रीय मतदारदिन, जागतिक अपंग दिन, जागतिक महिला दिन, जागतिक तृतीयपंथीय ओळख दिन असे उपक्रम राबवले जातील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood Indian Missing : नेपाळमध्ये शेकडो भारतीय पर्यटक बेपत्ता, महाराष्ट्र सरकारकडून हेल्पलाइन सुरू, असा करा संपर्क

Gokul Election 2026 : 'गोकुळ'च्या सत्ताकारणाचा काउंटडाऊन सुरू! अंतिम मतदार यादीची तारीख ठरली; उमेदवारी अर्जाचा मुहूर्तही निश्चित, 410 संस्थांच्या हरकतीवर सुनावणी

Pune News: आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची झिरवळांकडून थट्टा? ‘खाऊन-पिऊन आंदोलन करा’ म्हणताच विद्यार्थ्यांनी सुनावलं

Hydrogen Train: जगातील सर्वांत शक्तिशाली हायड्रोजन रेल्वेचा नवा विक्रम; भारताच्या पहिल्या ट्रेनने ६ हजार किमी प्रवास पूर्ण

Marathi News Live Updates : कात्रज घाटात भाजपशी संबंधित निवडणूक साहित्याचा खच; स्वच्छता ग्रुपकडून कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT