Nashik Road railway station News esakal
नाशिक

नाशिक रोड रेल्वे स्थानकावर होणार Electrical Vehicle Charging Point

सकाळ वृत्तसेवा

नाशिक रोड : नाशिक रोड रेल्वे स्थानकावर इलेक्ट्रिकल व्हेईकल चार्जिंग स्टेशनची व्यवस्था केली जाणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात इलेक्ट्रिकल व्हेईकल चांगल्या प्रकारे नाशिक रोड रेल्वे स्थानकात सशुल्क चार्ज करता येणार आहे. रेल्वेच्या महसुलात सध्या वाढ करण्यासाठी विविध प्रकारे नागरिकांसाठी सेवा प्रदान केल्या जात आहे. (Electric Vehicle Charging Point will done at Nashik Road Railway Station Nashik Latest Marathi News)

रेल्वेला नफा व्हावा, महसूल वाढवा आणि लोकांना दर्जात्मक आणि गुणात्मक सेवा मिळावा हा या योजनेचा उद्देश आहे. यासाठी येणाऱ्या काळात पेट्रोलच्या किमती पाहता इलेक्ट्रिकल व्हेईकल मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. दूरदृष्टीचा विचार करून मध्य रेल्वेच्या अंतर्गत असणाऱ्या नाशिक रोड रेल्वे स्टेशनवर इलेक्ट्रिकल व्हेईकल चार्जिंग सिस्टीम विकसित केली जाणार आहे.

यासाठी पाच वर्षांच्या कालावधीसाठी निविदा प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यासाठी पुरवठादारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या चार्जिंग स्टेशनची संख्या अद्याप कळू शकली नसली तरी एकावेळी अनेक व्हेईकल चार्ज करता येणार आहे. यासाठी नाशिक रोड रेल्वे स्थानकावर रेल्वेच्या मालकीची प्रशस्त जागा आहे. प्रीमिअम पार्किंगच्या जागीही स्टेशनचा विचार केला जाऊ शकतो, असे सूतोवाच करण्यात येत आहे.

"खरंतर इंधनमुक्त प्रवास करण्यासाठी ही चांगली संकल्पना रेल्वे विकसित करीत आहे. या माध्यमातून रेल्वेला चांगला रोजगार मिळून महसुलात वाढ होईल. लोकांनाही चार्जिंगची सुविधा चांगल्या प्रकारे उपलब्ध होईल." - सुयोग गांधी, उद्योजक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump Tariff: तर हा आहे अमेरिकेचा मास्टर प्लॅन, भारतावर का लावला टॅरिफ? पत्रकार परिषदेत सांगतिलं कारण

Pune Rain Update : पावसाचा जोर पुण्यात ओसरला; कमाल तापमानात दोन ते तीन अंशांनी वाढ

Khadakwasla Dam : पावसाचा जोर ओसरला, खडकवासला धरणातून विसर्गात घट

Solapur Fraud: गृहनिर्माणची जागा परस्पर विकून २७ लाखांचा अपहार; २२ जणांवर गुन्हा, शासनाची फसवणूक

Solapur Accident: 'नान्नजच्या अपघातग्रस्त शेतकऱ्याचा अखेर मृत्यू'; दुचाकीच्या समोर कुत्रा आडवा आल्याने अपघात

SCROLL FOR NEXT