Dangerous electric wires hanging in front of a house in Parshwanathnagar area here. esakal
नाशिक

Nashik News : वीजतारा दारात, नागरिक कोमात; मनपा, महावितरणचे दुर्लक्ष

सोयगावात बहुतांश ठिकाणी वीजपुरवठा करणाऱ्या विद्युतधारा कुठे घराच्या अंगणावर तर कुठे संरक्षक भिंतींवर लोंबकळत आहेत.

योगेश बच्छाव

Nashik News : सोयगावात बहुतांश ठिकाणी वीजपुरवठा करणाऱ्या विद्युतधारा कुठे घराच्या अंगणावर तर कुठे संरक्षक भिंतींवर लोंबकळत आहेत. काही ठिकाणी झाडांच्या फांद्यांमध्ये अडकल्यामुळे धोका निर्माण झाला आहे.

रस्त्याने जाताना नागरिकांचा हात पुरेल इतक्या खाली तारा झुकल्या आहेत. अनेक वेळा पाठपुरावा करून देखील महावितरण अधिकाऱ्यांच्या याकडे दुर्लक्ष आहे. (Electricity at door and Neglect of Municipalities Mahavitaran nashik news)

सोयगाव येथील पार्श्वनाथनगर येथे घरासमोरील वीजतारा जमिनीकडे लोंबकळल्या आहेत. जोराचा वारा अथवा पाऊस आल्यास या विद्युत तारांच्या घर्षणातून शॉर्टसर्किट होऊन जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबत अनेक वेळा मनपा व महावितरणकडे तक्रार करण्यात आली, परंतु, अद्यापही महावितरणने या लोंबकळणाऱ्या तारा खेचलेल्या नाहीत, त्यामुळे धोका तसाच आहे, यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

रस्त्याने मध्यम उंचीची वाहने गेली तर वीजतारा गाड्यांच्या छताला स्पर्श करतात. या तारा जुनाट झाल्या असून तुटून रस्त्यावरून जाणाऱ्या-येणाऱ्या नागरिकांच्या जीवावर देखील बेतू शकते. महावितरणचे मात्र याकडे दुर्लक्ष झाले आहे. या हलगर्जीपणामुळे लोंबकळणाऱ्या तारांपासून दुर्घटना घडू शकते. नागरिक दहशतीखाली असून याची तातडीने दखल घ्यावी, पालकमंत्री दाद भुसे यांनी संबंधितांना आदेशित करावे अशी मागणही स्थानिक नागरिकांना केली आहे.

''लोंबकळणाऱ्या तारांबाबत वीज वितरण कंपनीतील अधिकारी, वायरमन व कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. माझ्या घरासमोर बाहेर निघाले तरी विजतारा समोर हाताला लागतील अशा स्थितीत आहेत. जीर्ण झाल्यामुळे त्या झुकल्या आहेत. अपघाताची शक्यता असून अधिकाऱ्यांनी तातडीने दुरुस्ती करावी. कंपनीच्या हलगर्जीपणामुळे जीवितहानी झाल्यास महावितरण अधिकारी व कर्मचारी जबाबदार राहतील.''- स्वप्नील शिसव, रहिवासी, पार्श्वनाथनगर.

''याबाबत अनेकवेळा अर्ज, निवेदन देऊन देखील संबंधित विभागाने कोणतीही दखल घेतली नाही. लोंबकळणाऱ्या विजेच्या तारा अक्षरशः आमच्या दारात आल्या आहेत. त्यामुळे आमच्यासाठी व येथील रहिवाशांसाठी त्या धोकादायक आहेत. मुलांना देखील घरात येताना जीव मुठीत धरून यावे लागते. त्यामुळे संबंधित अधिकारी व विभागाने तत्काळ दखल घेत विजतारांची दुरुस्ती करावी.''- प्रणव जोशी, रहिवासी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monorail Breakdown Update : चेंबूरमध्ये मोनोरेलमध्ये बिघाड, ३०० हून अधिक प्रवाशांची सुटका, ६ जणांना त्रास

AUS vs SA, 1st ODI: केशव महाराजच्या फिरकीने ऑस्ट्रेलियाचे कंबरडं मोडलं; ५ विकेट्स घेत द. आफ्रिकेचा विक्रमी विजय

Operation Sindoor : शालेय अभ्यासक्रमात भारतीय लष्कराची शौर्यगाथा सांगणार! 'ऑपरेशन सिंदूर' आता अभ्यासक्रमात शिकवणार...

Mumbai-Pune Latest Rain Updates Maharashtra: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर

World Cup 2025 India Squad: वर्ल्ड कपच्या भारतीय संघात शफाली वर्माला स्थान का नाही? निवड समिती अध्यक्षांनी सांगितलं खरं कारण

SCROLL FOR NEXT