electricity supply esakal
नाशिक

Nashik News: MPSLच्या कारभारामुळे मालेगावला वीज ग्राहक त्रस्त

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : शहरात गेल्या चार वर्षापासून खासगी वीज वितरण कंपनी कार्यरत आहेत. कंपनी आल्याने नागरिकांना जलद गतीने सुविधा मिळतील अशी आशा होती.

परंतु शहरातील वीज ग्राहकांना नवीन वीजमीटर जोडणीसाठी एमपीएसलच्या कार्यालयात सहा-सहा महिने चकरा मारण्याची वेळ आलेली आहे. (Electricity consumers in Malegaon suffering due to the mismanagement of MPSL Nashik News)

दरेगाव येथील सचिन गाडे या व्यावसायिकांचा मीटर खराब असल्याने कंपनी कर्मचाऱ्यांनी ते मीटर काढले. मीटर काढून सहा महिने झाले तरी त्यांना दरमहा दोन ते तीन हजार रुपये सरासरी बिल दिले जात आहे.

श्री. गाडे यांनी नवीन मीटरसाठी सहा महिन्यांपासून अर्ज केला असून कंपनीतर्फे फॉल्टी मीटरचे बील भरा त्यावेळेस तुम्हाला नवीन मीटर देण्यात येईल असे उत्तर दिले जाते. या जाचामुळे श्री. गाडे त्रस्त झाले आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

येथील कॅम्प रस्त्यावर असलेल्या कार्यालयात कॅम्प-संगमेश्‍वर, दरेगाव-सायने या भागातील शेकडो ग्राहक चकरा मारतात. येथील कॅम्प भागात राहणारे निलम बरंठ यांनी दुसऱ्या नवीन वीज मीटरसाठी अर्ज केला होता.

त्यांना चार महिन्यापासून कार्यालयात चकरा मारुन सुद्धा नवीन मीटर मिळाले नाही. वीज ग्राहकांच्या समस्या तातडीने मार्गी लागत नसल्याच्या तक्रारी येथे आलेल्या ग्राहकांनी केल्या.

यातच वीजबील वेळेवर न मिळणे, ग्राहकांना बिलावर जास्त प्रमाणात लावलेले व्याज यासह विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chiplun Flood News : चिपळूण, राजापूर, खेडमध्ये दुकानांसह घरांत पाणी, पाच नद्या वाहताहेत धोक्याच्या पातळीवर

Taj Mahal Video: ताजमहालच्या तळघरात नेमकं काय आहे? कायम बंद असलेल्या गूढ खोलीत शिरला तरुण, व्हिडिओ व्हायरल!

मुंबईचा फौजदारच्या रिमेकमध्ये प्राजक्ता पुन्हा गश्मीरसोबत दिसणार ? अभिनेता म्हणाला "मी रिमेक बनवेन पण.."

Solapur News: 'आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणा': राष्ट्रपतींकडे मागणी; सोलापूरच्या राजश्री चव्हाणसह ५६ जणांनी घेतली भेट

Flood Alert Kolhapur : कोल्हापुरात पाऊस थांबला तरीही पंचगंगा नदीची धोका पातळीकडे वाटचाल, आलमट्टीतून विसर्ग वाढला

SCROLL FOR NEXT