नाशिक

दुष्काळात शेतीला संजीवनी; प्रत्येक जिल्ह्याला नवीन १ हजार रोहित्र मंजूर

CD
दुष्काळसदृश स्थितीत वीजयंत्रणा सक्षमसाठी जिल्ह्यांना २० कोटी --- वितरण रोहित्र, ‘स्पेशल डिझाइन ट्रान्‍स्फॉर्मर’ व ‘कॅपॅसिटर बँक’ खरेदीसाठी विशेष तरतूद सकाळ वृत्तसेवा नाशिक रोड, ता. ६ : राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना सिंचनासाठी सुरळीत वीजपुरवठा मिळावा, यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. वितरण रोहित्र, ‘स्पेशल डिझाइन ट्रान्स्फॉर्मर’ (एसडीटी) आणि ‘कॅपॅसिटर बँक’ खरेदीसाठी जिल्हा नियोजन व विकास समितींतर्गत (डीपीडीसी) प्रत्येक जिल्ह्याला २० कोटी रुपयांपर्यंत विशेष निधी उपलब्ध करून देण्याच्या प्रस्तावास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य शासनाने मंगळवारी (ता. ६) मंजुरी दिली. कमी पर्जन्यमानामुळे राज्यातील ३५८ पैकी २६५ तालुक्यांत दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. ‘महावितरण’कडून राज्यातील सुमारे ४७ लाख कृषी ग्राहकांना विविध क्षमतेच्या वितरण रोहित्रांद्वारे वीजपुरवठा केला जातो. या पार्श्वभूमीवर वीजयंत्रणा सक्षम करण्यासाठी विशेष निधीतून तातडीने कामे हाती घेण्यात येणार आहेत. यात अतिभारित किंवा नादुरुस्त वितरण रोहित्र बदलण्यासाठी नवीन रोहित्रांची खरेदी केली जाईल. कृषी वीजवाहिन्यांवरील घरगुती ग्राहक, तसेच शेतातील घरांना सुरळीत वीजपुरवठा मिळावा, यासाठी आवश्यकतेनुसार सिंगल फेज व थ्री फेज ‘स्पेशल डिझाइन ट्रान्स्फॉर्मर’ बसविण्यात येतील. तसेच, लांब अंतराच्या वीजवाहिन्यांवर कमी दाबाचा वीजपुरवठा होण्याची समस्या दूर करण्यासाठी आवश्यकतेनुसार ‘कॅपॅसिटर बँक’ बसविण्यात येणार आहेत. स्थानिक गरजेनुसार आवश्यक कामांची तांत्रिक तपासणी करून ‘महावितरण’च्या अधीक्षक अभियंता कार्यालयामार्फत अंदाजपत्रके तयार केली जाणार आहेत. ही अंदाजपत्रके संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात येतील. दुष्काळसदृश परिस्थितीत शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी या कामांना जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत तातडीने प्रशासकीय मान्यता देण्यात येणार आहे. या कामांच्या मान्यतेचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले असून, मंजूर निधीच्या विनियोगाचा अहवाल ‘महावितरण’च्या अधीक्षक अभियंता कार्यालयाला विहित कालावधीत जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करावा लागणार आहे. त्यामुळे दुष्काळसदृश परिस्थितीत सिंचनासाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासह ग्रामीण भागातील वीज वितरण यंत्रणा अधिक सक्षम होण्यास मदत होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Milk Adulteration : दुध भेसळीचे धागेदोरे मंचरपासून सोलापूर, इंदापूरपर्यंत; ‘एफडीए’ ने काढली भेसळखोरांची कुंडली, 'सोनाई डेअरी'ला भेसळयुक्त दूधाचा पुरवठा

Pune News : आम्ही अधिकारी होण्याचे स्वप्न बघायचे नाही का?; महाज्योतीच्या विद्यार्थ्यांचा सवाल, दोन केंद्रावरील परीक्षा रद्द

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

Shendurwada News : रक्तरंजित वाळू, जमिनीच्या व्यवहाराची नशा, अन् विकासकामांतील भ्रष्टाचार मार्गाने पैसा कमावण्याचा नाद सुटेना

MPSC Agitation Suspended : एमपीएससी विद्यार्थ्यांचे टिळक चौकातील आंदोलन स्थगित; उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर निर्णय

SCROLL FOR NEXT