Electricity power supply of village due to wireman alcohol addiction Latest news nashik sakal
नाशिक

Latest news | व्यसनाधीन वायरमनमुळे गाव अंधारात; कठोर कारवाईची मागणी

कामचुकार कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.

सकाळ वृत्तसेवा

नामपूर (जि. नाशिक) : द्याने (ता. बागलाण) येथील विद्युत रोहित्रात बिघाड झाल्याने गाव अंधारात आहे. याबाबत महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना जाब विचारण्यासाठी गेलेल्या शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना संबंधित वीजकर्मचारी मद्यधुंद अवस्थेत आढळून आल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. गाव अंधारात ठेवणाऱ्या संबंधित कामचुकार कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी संघटनेचे तालुका कार्याध्यक्ष शैलेंद्र कापडणीस यांनी केली आहे. (Latest marathi news)

मोसम खोऱ्यात गेल्या काही दिवसांपासून महावितरण कंपनीच्या भोंगळ्या कारभाराने शेतकरी, सर्वसामान्य ग्राहक कमालीचे वैतागले आहेत. द्याने गावातील वीज रोहित्रामध्ये वारंवार बिघाड होत असल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. गावातील वीजपुरवठा बंद झाल्याने सार्वजनिक पाणीपुरवठा यंत्रणाही विस्कळीत झाली आहे. गावाची बत्ती गुल झाल्याने शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना जाब विचारला असता उडवाउडवीची उत्तरे दिल्याने ग्रामस्थांचा पारा अधिकच चढला.

त्यानंतर शुक्रवारी (ता. ८) रात्री शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आसखेडा (ता. बागलाण) येथील वीज उपकेंद्र गाठले. या ठिकाणी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना संबंधित वीज कर्मचारी दारूच्या नशेत आढळून आले. त्यांना शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्‍नांची उत्तरेही देता येत नव्हती. दारूच्या नशेत वीज उपकेंद्राच्या आवारात दुर्दैवाने काही दुर्घटना घडली तर याला जबाबदार कोण, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. या वेळी शेतकरी संघटनेचे महेंद्र कापडणीस, द्याने सहकारी सोसायटीचे संचालक हितेंद्र कापडणीस, दिलीप कापडणीस उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT