Disabled Person News esakal
नाशिक

Nashik News : दिव्यांगांसाठी खुशखबर! जिल्ह्यात दिव्यांगांना मोफत कृत्रिम अवयव; जाणून घ्या सविस्तर...

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांसाठी एलिम्को संस्थेतर्फे मोफत कृत्रिम अवयव देण्यात येणार आहेत. अशी माहिती पालकमंत्री दादा भुसे यांनी दिली.

भुसे म्हणाले की जिल्ह्यात सर्व ग्रामपंचायतीना ग्रामपंचायतस्तरावरील दिव्यांगांचे सर्वेक्षणाचे निर्देश दिले असून दिव्यांग बांधवांनी त्यांच्या ग्रामपंचायतीत जाऊन समाज कल्याण विभागाने तयार केलेल्या वेब अॅप्लिकेशनमध्ये नाव नोंदणी करावी. (elimco organization will provide free prosthetic limbs for disabled people in district nashik news)

सप्टेंबर महिन्यात ‘एलिम्को’ तर्फे तपासणी शिबिर होणार आहे. त्यात जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तीसाठी प्रत्येक तालुक्यात दिव्यांगाना कृत्रिम अवयव वाटप करण्याकरिता पूर्व तपासणी शिबिर होईल. ३० जूनला झालेल्या बैठकीत निर्देश देण्यात आले आहेत.

एलिम्कोच्या माध्यमातून तपासणी शिबिराचा तालुक्यातील जास्तीत जास्त दिव्यांगाना लाभ घेता येईल, यासाठी यंत्रणेचे प्रयत्न सुरू आहेत. तालुकास्तरावर राबविण्यात येणाऱ्या शिबिरासाठी गटविकास अधिकारी यांना नोडल अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे.

शिबिरस्थळी दिव्यांग प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, इ. अन्य कागदपत्रांअभावी दिव्यांग मदतीपासून वंचित राहू नये, यासाठी नोंदणी आवश्यक असल्याचे श्री. भुसे यांनी सांगितले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

शिबिरापूर्वी सर्व ग्रामपंचायतस्तरावरील दिव्यांगांचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश प्राप्त झाल्यानंतर जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाने वेब बेस अॅप्लिकेशन तयार केले असून त्याचे प्रशिक्षण २१ जुलैला प्रत्येक तालुक्यातील २ तंत्रस्नेही ग्रामसेवक यांना देण्यात आले आहे.

२५ जुलैला प्रत्येक पंचायत समितीस्तरावर बीडीओ यांच्या उपस्थितीत संबंधित तालुक्यातील २ मास्टर ट्रेनर यांनी तालुक्यातील सर्व ग्रामसेवक यांना पंचायत समितीस्तरावर प्रशिक्षण दिले.

प्रशिक्षण समयी जिल्हा परिषदस्तरावरून जिल्हा समाज कल्याण अधिकारी योगेश पाटील यांनी शंकांचे निरसन केले. जिल्हाधिकारी जलज शर्मा, मुख्यकार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या देखरेखीखाली सर्व यंत्रणा काम करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG, 1st ODI: भारताने उडवला अफगाणिस्तानचा धुव्वा; कर्णधार गिलची शानदार फिफ्टी, तर केएल राहुलची 'क्लास' फिनिश

Pune Fraud News : गुंतवणुकीच्या आमिषाने १२ कोटींची फसवणूक; पुण्यातील ४६ गुंतवणूकदारांची फसवणूक

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंच्या पथकाची स्वारगेट बस स्टॉपवरील दुकानांवर धाड; ...तोपर्यंत दुकानं बंद ठेवण्याच्या सूचना

Gas Cylinder Shortage : खाद्यपदार्थांच्या दरात वाढ! दरवाढीमुळे हॉटेल व्यवसाय ‘गॅस’वर; बचतीसाठी शेगड्यांचा वापरही कमी

Modi-Trump Meeting: डोनाल्ड ट्रम्प-नरेंद्र मोदी यांची भेट ठरली; व्हाईट हाऊसची मंजुरी, 'या' मुद्द्यांवर होणार चर्चा

SCROLL FOR NEXT