dilip kumar nashik connection esakal
नाशिक

दिलीपकुमार यांच्या नाशिकशी भावनीक आठवणी

विनोद बेदरकर

नाशिक : ट्रेजडी किंग दिलीप कुमार ऊर्फ युसुफ खान (dilip kumar) यांचे देवळाली कॅम्पशी जुने जिव्हाळ्याचे ऋणानुबंध राहिले आहे. त्यांचे या भागात लहानपण गेले आहे. सोबत आईसह कुटुंबाचे दफनविधी येथे झालेला असल्याने अनेक वर्षे ते आईच्या कबरीवर चादर चढवायला येत. आईच्या श्रद्धांजलीच्या हळव्या आठवणीशिवाय चित्रीकरणाच्या आणि इतरही अनेक आठवणीशी ते जोडलेले आहे. (Emotional-memories-of-Dilip-Kumar-with-Nashik-marathi-news)

देवळाली कॅम्पशी भावनीक आठवणी

दिलीपकुमार यांचे लहान काही काळ देवळाली कॅम्पला गेले आहे. त्यांचे कुटुंब देवळाली कॅम्पला राहायला होते. देवळाली कॅम्पला त्यांच्या कुटुंबाचा घर जमीन जुमला असल्याने अनेक वषार्पासून त्यांचे नातेवाईक येथे स्थायिक आहे. सध्या दिलीपकुमार यांचे पुतणे जावेद नूर महोमद खान देवळाली कॅम्पला राहतात. स्वातंत्र्यापूर्वी म्हणजे १९४२ ला दिलीपकुमार यांच्या मातोश्री आयेशा सरवर खान यांना प्रकृती अस्वस्थामुळे हवा पालटासाठी देवळाली कॅम्पला फातिमा सॅनोटरीत आणले गेले. वडील गुलाम सरवर खान हे तोफखाना केंद्राला लष्कराला फळपुरवठा करायचे. देवळाली कॅम्पला असताना दिलीपकुमार यांच्या मातोश्री आयेशा खान यांचे निधन झाले. त्यामुळे दिलीपकुमार यांचे बालपणीचे शिक्षण देवळाली कॅम्पला मुसा कॉटेज येथेच झाले.

आईच्या वर्षश्राद्धाला चादर चढवायला ते येत

देवळाली कॅम्प वडनेर मार्गावरील ईदगाह मैदानाजवळील कबरस्तानात त्यांच्या आईचा दफनविधी झाला. आयेशा यांच्या निधनानंतर गुलाम सरवर खान कुटुंबाला घेऊन मुंबईला स्थायिक झाले. त्यांचे सहा भाऊ सहा बहिणीचे शिक्षण मुंबईत तर काहींचे पुण्यात शिक्षण झाले. कालांतराने त्यांचे वडील गुलाम खान यांचे मुंबईत निधन झाले पण त्यांचा दफनविधी देवळाली कॅम्पला झाला. त्यानंतर दिलीपकुमार यांच्या मोठ्या बंधूवर येथेच दफनविधी झाला. चित्रपट सृष्टीत उच्च पदावर विराजमान झाल्यानंतर दिलीपकुमार हे कॅम्पला कायम येत विशेषतः त्यांच्या आईच्या वर्षश्राद्धाला चादर चढवायला ते येत. पण ते आल्यानंतर लोकांची गर्दी होत असल्याने शक्यतो रात्रीच येत.

चित्रीकरणाच्या आठवणी

ट्रेजडी किंग दिलीप कुमार उर्फ युसुफ खान यांच्या गंगा जमना चित्रपट नांदुर वैद्य या ठिकाणी रोकडोबा गाव परिसरात चित्रपटाचे चित्रीकरण झाले त्या ठिकाणी त्यांचे पुतणे जावेद खान व दिलीप कुमार यांच्या चाहत्यांनी भेट देत त्या काळ च्या आठवणींना उजाळा दिला..१९५६ ते १९६० जवळपास तीन वर्ष पूर्ण गंगा जमना चित्रपटाचे चित्रीकरण नांदुर वैद्य ,व परिसरात झाले व १९६१ साली प्रदर्शित ही झाला खूप गाजला, नितीन बोस व दिग्दर्शक असलेल्या चित्रपटात नायक दिलीप कुमार ,नासीर खान,वैजयंती माला मुख्य भूमिका साकारली आहे. त्या चित्रपटात जो वाडा चित्रीकरणासाठी वापरण्यात आला तो रोकडे कुटुंबाचा आहे तो या कुटुंबाने अनेक वर्षा आठवणी जपल्या आहे. चित्रीकरण झालेल्या वाड्या समोरील जागा ,बैल गाडीची ती गाडी ,त्या काळची पिठाची गिरणी ,पुरातन तिजोरी,कब्बडीचे मैदान त्यावेळी चित्रपटात नांदुरवैद्य गावातील परशराम तुळशीराम मुसळे हे दिलीप कुमार यांच्या सोबत त्यात कब्बडी खेळण्याच्या अनेक आठवणी नांदूरवैद्य गावातील जुने जाणते लोक सांगायचे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Cup 2025: भारताविरुद्ध पाकिस्तानने टॉस जिंकला, प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल; हस्तांदोलन झालं की नाही?

पूरग्रस्तांसाठी ५ रुपये मागितले तर..., शेतकऱ्यांकडून वसुलीच्या टीकेवर मुख्यमंत्री फडणवीस कडाडले; कारखान्यांना इशारा

Latest Marathi News Live Update: राज ठाकरे मातोश्रीवर दाखल!

Raju Shetty: राज्य सरकार दलाली करतंय का: राजू शेट्टी

महावितरणचा दरवाढीचा शॉक! वीज होणार महाग, प्रति युनिट 'इतके' पैसे द्यावे लागणार जास्त

SCROLL FOR NEXT