Dr Sudhakar More accepted charge esakal
नाशिक

Nashik ZP News: जिल्ह्यातील प्रलंबित आरोग्यांचे प्रश्नांवर देणार भर; डॉ. सुधाकर मोरे यांनी स्वीकारला पदभार

सकाळ वृत्तसेवा

Nashik ZP News : जिल्ह्यातील आरोग्य विभागातील प्रलंबित प्रश्न सोडविण्यावर भर देणार असून आरोग्य विभागात रिक्त जागांचा प्रश्न असला तरी, समतोल साधून ग्रामीण भागातील आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी काम करणार असल्याचे जिल्हा परिषदेचे नवनियुक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे यांनी सांगितले. (Emphasis on pending health issues in district Dr Sudhakar More accepted charge Nashik News)

जिल्हा परिषदेला तब्बल नऊ महिन्यानंतर जिल्हा आरोग्य अधिकारी मिळाले असून, या रिक्त असलेल्या जागी रायगडचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे यांची ५ जुलै रोजी नियुक्ती झाली होती.

डॉ. मोरे यांनी सोमवारी (ता.१७) पदभार स्वीकारला. यावेळी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र बागूल यांनी डॉ. मोरे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. पदभार स्वीकारत डॉ. मोरे यांनी कामकाजास प्रारंभ केला.

दिवसभरात आरोग्य संघटनांच्या विविध पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेत स्वागत केले. तसेच संघटनांच्या माध्यमातून प्रलंबित प्रश्न मांडले. परिचारिका संघटनेने देखील भेट घेऊन प्रलंबित प्रश्न सोडविण्याची मागणी यावेळी केली.

त्यावर, डॉ. मोरे यांनी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यावर भर देणार असल्याचे यावेळी सांगितले. जिल्हा मोठा असून आदिवासी व बिगर आदिवासी तालुके आहेत.

त्यामुळे सर्व भागात आरोग्य सेवा पोहचविण्याची महत्त्वाची जबाबदारी आरोग्य यंत्रणेवर असल्याने, ही सेवा पोहोचविण्यासाठी काम करणार असल्याचे डॉ. मोरे यांनी ‘सकाळ’ शी बोलताना स्पष्ट केले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

बोगस वैद्यकीय प्रमाणपत्राबाबत लक्ष घालणार

आरोग्य विभागांतर्गत कर्मचाऱ्यांनी बदल्या करताना वैद्यकीय प्रमाणपत्र दाखल केलेले आहे. या प्रमाणपत्रांबाबत तक्रारी असून तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयाकडे दाखल केलेले असल्याचे विचारले असता, याबाबत माहिती घेऊन योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे डॉ. मोरे यांनी सांगितले.

कर्मचारी उपस्थिती अनिवार्य

प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र येथे कर्मचारी उपस्थित राहत नसल्याचे दिसून येत असल्याच्या तक्रारी असल्याबाबत विचारणा केली असता डॉ. मोरे यांनी आरोग्य केंद्रात कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहणे आवश्यक आहे.

आरोग्य केंद्रांमध्ये बायोमेट्रीक हजेरी बसविली जाणार आहे. याबाबतचे मशिन खरेदीची प्रक्रीया सुरू असून लवकरच ही यंत्रणा कार्यान्वित केली जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat: राज्यात आडाचीवाडी ग्रामपंचायत प्रथम; पुणे जिल्हा परिषदेला दुसरा क्रमांक, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

२०२३मध्ये IPS बनलेल्या ३० वर्षीय अधिकाऱ्याचा राजीनामा; लव्ह मॅरेजनंतर महाराष्ट्र केडरला केलेली बदली

Maharashtra Live News : शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही; दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे – एकनाथ शिंदे

HARDIK PANDYA BIRTHDAY: हार्दिक पांड्या ऑलराउंडर कसा बनला? गर्लफ्रेंड माहिका शर्माने सांगितला आजवर कधीही न ऐकलेला किस्सा!

Palghar Crime: पालघरमध्ये ६१ वर्षीय महिलेची हत्या; घरातील सामान अस्ताव्यस्त, चोरीच्या उद्देशाचा संशय

SCROLL FOR NEXT