Nashik Municipal Corporation esakal
नाशिक

नाशिक : आस्थापना खर्च घटल्याने मनपात नोकर भरतीचा मार्ग सुकर

महापालिकेत ३०३८ पद रिक्त असून, अपुऱ्या मनुष्यबळामुळे कामकाजावर परिणाम झाला आहे.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : महापालिकेचा आस्थापना खर्च कमी झाल्याने प्रलंबित नोकरभरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. महापालिकेत ३०३८ पद रिक्त असून, अपुऱ्या मनुष्यबळामुळे कामकाजावर परिणाम झाला आहे. मात्र, नोकरभरतीसाठी महापालिकेचा आस्थापना खर्च हा ३५ टक्क्यांच्या आत असावा लागतो. सध्या हा खर्च ३३. २ टक्के इतका कमी झाला आहे. त्यामुळे महापालिकेला नोकरभरती करता येणार आहे. (Employee recruitment in Nashik Municipal Corporation)

तत्कालीन महापौर सतीश कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष महासभेत नोकरभरती करण्यासाठी आवश्यक असलेला ठराव महासभेत एकमताने मंजूर झाला आहे. मात्र, २०२०- २१ आर्थिक वर्षात महापालिकेचा आस्थापना खर्च ३८ टक्के असल्याने नोकरभरतीला मान्यता मिळूनही नोकर भरती होऊ शकली नव्हती. आता १४ मार्चपासून प्रशासकीय राजवट सुरू असल्याने पदाधिकाऱ्यांच्या सुविधा बंद आहेत. पदाधिकाऱ्यांच्या कार्यालयातील वीजबिल, वाहनांच्या इंधन खर्चात बचत झाली आहे. प्रशासक तथा आयुक्त रमेश पवार यांनी काटकसरीचे धोरण स्वीकारत वसुलीवर लक्ष दिल्याने आस्थापना खर्च ३३. २ टक्के इतका घटला आहे. त्यामुळे महापालिकेतील रिक्त असलेली ३०३८ पद भरता येणार आहे. महापालिकेत ७७१७ पद मंजूर असून, त्यापैकी ४६७९ कर्मचारी कार्यरत तर ३०३८ पद मात्र रिक्त आहे. त्यात कनिष्ठ अभियंते, दुय्यम अभियंते, डॉक्टर, लिपिक, अग्निशमन अधिकारी, निरीक्षक यासह अनेक महत्त्वाच्या अत्यावश्यक सेवेतील पदावरही पुरेसे कर्मचारी नाहीत. जेमतेम ६० टक्के मनुष्यबळावर महापालिकेच्या कामकाजाचा गाडा सुरू आहे.

अ वर्ग ब वर्ग क वर्ग ड वर्ग

१५९, ४९, १४७२ १२०५

सद्यःस्थिती

मंजूर पदे - ७७१७
कार्यरत - ४६७९
रिक्त - ३०३८



ठळक नोंदी

- अनेक वर्षात मिळकत कर थकला आहे.
- वर्षानुवर्षे पाणीपट्टीत वाढ झालेली नाही
- जमा आणि खर्चात फारशी तफावत नाही.
- मिळकती शोधून महसूल वाढीचे आव्हान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray visits Meenatai Thackeray statue : उद्धव ठाकरेंनी केली मीनाताईंच्या पुतळ्याची बारकाईने पाहणी अन् म्हणाले ‘’या मागे दोनच व्यक्ती…’’

Uddhav Nimse : मुंबई हायकोर्टाकडूनही जामीन नाकारला: उद्धव निमसे अखेर पोलिसांपुढे शरण

Navratra and Overthinking Tips: मन गोंधळले असेल तर नवरात्रीचे ९ दिवस देतील नवा आधार! अशी करू शकता ओव्हरथिंकिंगवर मात

Jalaj Sharma : जिल्हाधिकारी जलज शर्मांची मोठी घोषणा: नाशिकमधील गड-किल्ले होणार स्वच्छ

राष्ट्रीय पुरस्कार विजेते अभिनेते उपेंद्र लिमये यांनी 'सुपर डान्सर चॅप्टर ५' मध्ये आदितीला दिला खास पाठिंबा

SCROLL FOR NEXT