नाशिक

कंपनीबाहेरील झाडावरच कामगाराने घेतला गळफास

CD
NSK26H33720 : अरविंद पाटील --- कंपनीबाहेरील झाडावरच कर्मचाऱ्याने घेतला गळफास आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २७ : महाबळ कॉलनीत वास्तव्यास असलेला ४५ वर्षीय कर्मचाऱ्याचा मृतदेह कंपनीबाहेरील झाडावर गळफास घेतलेल्या अवस्थेत मंगळवारी (ता.२७) सकाळी आढळून आला. अरविंद श्‍यामराव पाटील (वय ४५) असे मृत कामगाराचे नाव आहे. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणी पाळधी पोलिस दूरक्षेत्रात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. अरविंद पाटील पाळधीतील स्नेहल इंडस्ट्रीज या कंपनीत मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे ते कामावर जाण्यासाठी सकाळी सहाच्या सुमारास घरातून निघाले. मात्र, कंपनीत कामावर न पोहोचता कंपनीबाहेरील एका झाडाला सुती दोरीच्या साहाय्याने त्यांनी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. कामगारांना आढळले सकाळी कामासाठी कंपनीत आलेल्या कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास हा प्रकार आला. सहकाऱ्यांनी त्यांना खाली उतरवून जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. अरविंद पाटील स्वभावाने शांत आणि मनमिळवू असे होते. नेहमीप्रमाणे आज त्यांची नऊला शिप्टमध्ये ड्यूटी असताना, ते चक्क सात वाजताच कंपनीत पोहोचले. येथील स्वीपरने त्यांना विचारले, तरी त्यांनी मुद्दाम लवकर आल्याचे सांगत त्याला टाळले. नंतर नवीन शिफ्ट कर्मचारी येण्याची वेळ झाल्यावर हा प्रकार लक्षात आला. तपासात मृत्यूच्या कारणांचा उलगडा होणार असल्याचे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Missile attack: सौदी अरेबियाच्या संरक्षण मंत्रालयावर बॅलिस्टिक क्षेपणास्त्राने हल्ला; येमेनमधील हूती बंडखोरांचा दावा

Pune News : फटाके विक्रीसाठी जागेच्या लिलावातून ४६ लाखांचे उत्पन्न

‘राजीव गांधी पंतप्रधान व्हावेत, असं मला कधीच वाटलं नाही’; सोनिया गांधी यांचा मोठा खुलासा

Pune Crime : पंचतारांकित हॉटेलमधील हायप्रोफाइल सेक्स रॅकेट उघडकीस; मॉडेलिंग क्षेत्रातील दोन तरुणींची सुटका

CSK COACHING STAFF : IPL २०२७ आधी CSK मध्ये मोठे बदल! अल्बी मॉर्केल, गॅरेथ बॅटींची एन्ट्री; मोहित शर्माकडे गोलंदाजीची जबाबदारी

SCROLL FOR NEXT