MLA Seema Hire while inaugurating the camp. With Dhananjay Bele, Rajendra Chinchole, D. B. Baviskar esakal
नाशिक

Skill Development Programme: कौशल्य विकास कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना रोजगार

सकाळ वृत्तसेवा

Skill Development Programme : युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी शासन योजनेनुसार राज्यभरात महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता, शिक्षण प्रशिक्षण संचालनालयातर्फे छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिराचे आयोजन केले जात आहे.

शिबिराचे उद्‌घाटन आमदार सीमा हिरे यांच्या हस्ते झाले. (Employment of students through skill development programme Inauguration of Chhatrapati Shahu Maharaj Yuva Shakti Career Camp nashik news)

दादासाहेब गायकवाड सभागृहात झालेल्या कार्यक्रमप्रसंगी जिल्हा उद्योजक संघटनेचे अध्यक्ष धनंजय बेळे, राजेंद्र चिंचोले, डी. बी. बाविस्कर, स्वप्नील कोंडो, नीलम मुळे, राजेंद्र पवार, श्रीकांत पाटील, आय. एम. काकड मार्गदर्शन केले.

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतर्फे दहावी, बारावी या महत्त्वाच्या टप्प्यानंतर विद्यार्थ्यांना करिअर संबंधी मार्गदर्शक करण्यात आले. राज्य शासनाकडून २८८ विधानसभा मतदारसंघाच्या क्षेत्रात प्रथमच अशा प्रकारच्या करिअर शिबिराचे आयोजन केले असून, ६ जूनपर्यंत विविध ठिकाणी ही शिबिर होणार आहेत.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना सहसंचालक प्रफुल्ल वाकडे यांनी या शिबिराचा उद्देश स्पष्ट केला. आमदार हिरे म्हणाल्या, विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शनासाठी घेण्यात येत असलेले या शिबिरातून विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा परीक्षा विविध अभ्यासक्रम या विषयी माहिती घ्यावी.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

अशा प्रकारच्या शिबिरांद्वारे चांगले करिअर निवडण्याची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध झाली आहे. राज्यातील शासकीय आणि खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधून प्रशिक्षण घेऊन इच्छिणाऱ्या युवकांना मार्गदर्शन करण्यासाठी सातपूर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतर्फे एका खास प्रदर्शन गॅलरीचे निर्माण करण्यात आले आहे.

कार्यक्रम यशस्वितेसाठी आयटीआयचे उपसंचालक आर. एस. मुंडासे, उपप्राचार्य मोहन तेलंगी, जिल्हा व्यवसाय शिक्षण अधिकारी इंद्रावन काकड, महिलांच्या आयटीआयचे प्राचार्य दीपक बाविस्कर यांनी परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोदी सरकार हिंदू-मुस्लिम कार्ड खेळतंय... राहुल गांधी सकारात्मक विचाराचे! Shahid Afridi च्या विधानाचा BJP कडून समाचार

Bigg Boss 19 : बिग बॉस 19 मध्ये दोन स्पर्धकांनी घातला राडा; कायमचे झाले नॉमिनेट, काय घडलं नेमकं जाणून घ्या

Latest Marathi News Updates : कुणबी प्रमाणपत्रासाठी काटेकोर पडताळणी अनिवार्य - बावनकुळे

Hingoli News : चार वर्षानंतरच्या मुहूर्ताला पालकमंत्र्यांचा खोडा; शिक्षक पुरस्काराचे वितरण पुढे ढकलले

Jintur Heavy Rain : येलदरी धरणातून २३ हजार ८०० क्युसेक विसर्ग; नदीकाठच्या गावांनी सतर्क राहण्याचे आवाहन

SCROLL FOR NEXT