young people 1.jpg 
नाशिक

जिल्ह्यातील दोन हजार तरुणांना दर वर्षी रोजगाराची संधी; प्रशासनही सकारात्मक

विनोद बेदरकर

नाशिक : काही वर्षांपासून बेरोजगारीचे प्रमाण वाढत असल्याने जिल्ह्यातील तरुणांना व्यावसायिक शिक्षण, प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न होणे गरजेचे आहे, अशी मागणी अनेक सामाजिक संस्था, संघटनांच्या पदाधिकाऱ्यांकडून खासदार गोडसे यांच्याकडे होत होती.

दोन हजार तरुणांना दर वर्षी रोजगार 

जिल्ह्यातील बेरोजगार तरुणांना व्यावसायिक शिक्षण, प्रशिक्षण मिळावेत आणि त्यातूनच त्यांना रोजगार मिळावा यासाठी खासदार हेमंत गोडसे यांच्यावतीने शासन पातळीवर सुरू असलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान संस्थेचे (सिपेट) व्यावसायिक शिक्षण, प्रशिक्षण केंद्र नाशिक जिल्ह्यात उभारण्याच्या प्रस्तावास राज्य सरकारच्या उद्योग विभागाने नुकतीच तत्त्वतः मान्यता दिली आहे. प्रस्तावित प्रकल्पाला लागणाऱ्या जागेचा प्रश्न निकाली काढण्यासाठी राज्याच्या उद्योग विभागाने गुरुवारी (ता. १८) जिल्हा प्रशासनाला पत्र पाठविले आहे. 

सिपेटच्या प्रशिक्षण केंद्राला राज्य शासनाची मान्यता 

बेरोजगारांच्या वाढत्या प्रमाणाचे गांभीर्य लक्षात घेऊन नाशिक जिल्ह्यात ‘सिपेट’चे व्यवसायिक शिक्षण, प्रशिक्षण उभारण्यासाठी खासदार गोडसे यांनी काही महिन्यांपासून प्रयत्न सुरू केले होते. दिल्ली मंत्रालयातील ‘सिपेट’च्या प्रशासनाकडे पाठपुरावा करीत, गेल्या आठवड्यात राज्याच्या उद्योग विभागाचे सचिव बलदेव सिंह यांची भेट घेऊन नाशिक परिसरात ‘सिपेट’चे व्यावसायिक शिक्षण, प्रशिक्षण केंद्र उभारण्याची मागणी केली. 

याकामी जिल्हा प्रशासनही सकारात्मक

बलदेव सिंह यांनी त्यांच्या दालनात अधिकाऱ्यांची बैठक घेत नाशिकला ‘सिपेट’चे केंद्र उभारण्याच्या प्रस्तावास तत्त्वतः मान्यता दिली. प्रस्तावासाठी जागा उपलब्ध करून देण्याविषयीचे पत्र दोन दिवसांपूर्वीच उद्योग विभागाने जिल्हाधिकाऱ्यांना पाठविले आहे. केंद्र उभारणीसाठी सुमारे पंधरा एकर सरकारी जागेची आवश्यकता आहे. जागा उपलब्धतेचा अहवाल तातडीने मंत्रालयात पाठविण्यासाठी खासदार गोडसे यांनी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, निवासी जिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांच्याशी चर्चा केली असून, याकामी जिल्हा प्रशासनही सकारात्मक आहे. 


दर वर्षी दोन हजारांना संधी 
प्रस्तावित ‘सिपेट’च्या केंद्रामुळे दर वर्षी दीड ते दोन हजार तरुणांना व्यावसायिक शिक्षण, प्रशिक्षणांची संधी मिळून त्यांना सहजपणे रोजगार उपलब्ध होणार आहे. 
- हेमंत गोडसे, खासदार, नाशिक  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: "देश ज्ञानेश कुमारांच्या बापाचा आहे का?" उद्धव ठाकरे कडाडले; केंद्र सरकारवरही बोचरी टीका

Maharashtra MLC Election 2026 : भाजपची मोठी घोषणा! विधान परिषद निवडणुकीसाठी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांचे उमेदवार जाहीर; पाहा संपूर्ण यादी

Latest Marathi News Live Update : CJP चे संस्थापक अभिजीत दिपके यांच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

Masarul Dam Water: अवैध उपशामुळे धरणाच्या पाणीसाठ्यावर संकट;मासरूळ धरणातील उपशावर कारवाईची मागणी

Kikvi Project Deal : किकवी प्रकल्प व्यवहाराच्या कोणत्याही चौकशीस तयार माजी संचालकांचा खुलासा; करार पारदर्शी

SCROLL FOR NEXT