NSK26H33789
यावल : शालेय साहित्य वाटप केलेल्या गरजू विद्यार्थ्यांसह सुधर्मा संस्थेचे प्रमुख हेमंत बेलसरे आदी.
---------------------
गरजू १०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप
-----
‘सुधर्मा’चा पुढाकार; काला ढोह-धुले पाड्यात विजयादशमीनिमित्त उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २८ : तालुक्यातील काला ढोह व धुले पाडा या दोन शाळांचा एकत्रित कार्यक्रम काला ढोह येथे मोठ्या उत्साहात नुकताच झाला. यावेळी दोन्ही शाळांतील १०० आदिवासी विद्यार्थ्यांना वह्या-पुस्तकांसह आदी शालेय साहित्य, मिठाई व खाऊचे वाटप करण्यात आले. ‘मंथन’ परीक्षेतील १५ गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही यावेळी करण्यात आला.
यावेळी मंथन परीक्षेत सर्वाधिक गुण मिळविणारी वृपाली बारेला हिला रोख बक्षीस देऊन गौरविण्यात आले. सोबतच गावात निरपेक्षपणे काम करणाऱ्यांचा श्रीमद् भागवत गीता प्रत व गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला. सुनीता बेलसरे यांनी सुधर्माच्या कार्याची प्रशंसा केली. प्रसंगी ज्या मुलांना कोणीच नाही अशा २०० मुलांचे पालकत्व सुधर्मच्या वतीने स्वीकारण्यात आले. या विद्यार्थ्यांना सायकल, शैक्षणिक साहित्य, आरोग्य सुविधा दिल्या जाणार असल्याचे सांगण्यात आले. सुधर्मा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष हेमंत बेलसरे यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी सूर्यकांत हिवरकर, नितीन तायडे, रोशनी नन्नवरे, भाग्यश्री नन्नवरे, नाना चव्हाण, सुनीता बेलसरे, अरुण बेलसरे, दिनकर बाविस्कर यांनी पुढाकार घेतला. शिक्षक श्रीकांत मोटे यांनी आभार मानले.
महिलांना साड्या वाटप
दसऱ्याचे औचित्य साधून सुधर्मा सामाजिक संस्थेतर्फे काळाडोह व धुळेपाडा येथील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील ९५ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यासह फराळाचे कीट वाटप करण्यात आले. गावातील महिलांना साड्या वाटप करण्यात आल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.