टुडे ४ : ॲंकर (जिल्हा - शहर कॉमन घ्यावे)
---
NSK26H31436
जळगाव : दीपस्तंभ मनोबल केंद्रात नुकत्याच पार पडलेल्या माहेर मेळाव्यात प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राज्यसभा सदस्य खासदार विनोद तावडे यांचे औक्षण करताना दिव्यांग विद्यार्थिनी. शेजारी यजुर्वेंद्र महाजन.
--------
रक्ताची नाती नसतानाही जुळले माहेरचे बंध
उपशीर्षक
दीपस्तंभ मनोबलचा उपक्रम; माहेर मेळाव्यासह माजी विद्यार्थ्यांचे स्नेहमिलन
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ५ : दिव्यांग, अनाथ, ट्रान्सजेंडर आणि आर्थिकदृष्ट्या वंचित विद्यार्थ्यांना शिक्षण, प्रशिक्षण, निवास आणि स्वावलंबनाची संधी देऊन त्यांच्या आयुष्याला नवी दिशा देणाऱ्या दीपस्तंभ फाऊंडेशन – मनोबल, जळगाव येथे नुकताच ‘माहेर मेळावा व माजी विद्यार्थी स्नेह मेळावा २०२६’ मोठ्या उत्साहात पार पडला.
या मेळाव्यास राज्यसभा खासदार विनोद तावडे आणि वर्षा तावडे हे दोघेही उपस्थित होते. मेळाव्याच्या पहिल्या दिवशी पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे व त्यांच्या पत्नी सानिका धिवरे यांचीही उपस्थिती लाभली. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे, खासदार स्मिता स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे (राजूमामा), अमोल शिंदे यांनी मेळाव्यास भेट देऊन मार्गदर्शन केले.
माहेर मेळाव्यात सहभागी विद्यार्थिनींसाठी पारंपारिक मंगळागौरीचे विविध खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम, संवादसत्रे आणि मनोरंजनात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी प्रसिद्ध ज्येष्ठ कार्डियाक ॲनेस्थेटिस्ट अलका मांडके, हेमा अमळकर, रश्मी भातखळकर, आणि राजेंद्र नन्नवरे यांची प्रमुख उपस्थिती होती. गणेश व सन्मिता शिंदे यांचा ‘गाव सुटेना’ हा कार्यक्रम या मेळाव्याचे विशेष आकर्षण ठरला.
मेळाव्यात यजुर्वेंद्र महाजन, वर्षा तावडे, क्रांती पाटील आणि गीता चव्हाण (डीसीपी) यांची मार्गदर्शनपर सत्रे झाली. व्यक्तिमत्त्व विकासासोबतच जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याची प्रेरणा विद्यार्थ्यांना या सत्रांतून मिळाली.
चौकट
दोन्ही हात नसतानाही केले औक्षण
विनोद तावडे व वर्षा तावडे यांचे औक्षण येथील माजी दिव्यांग विद्यार्थिनी माऊली अडकूर हिने केले. ती सध्या सोलापूर महापालिकेत लिपिक पदावर कार्यरत आहे. दोन्ही हात नसतानाही जिद्द आणि आत्मविश्वासाच्या बळावर आयुष्याची वाटचाल करणाऱ्या माऊलीने केलेले हे औक्षण उपस्थितांसाठी भावनिक आणि प्रेरणादायी ठरले.
---------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.