छायाचित्र H33741आणि H33793---३३७४०
-------
NSK26H33741
कालिदास कलामंदिर : मविप्र समाज संस्था नाशिक आणि एस.जे. ए. ॲनालिटिकल लॅबोरेटरी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सशक्त युवा, सशक्त भारत’ अभियानांतर्गत व्यसनमुक्त जीवनाची सामुहिक शपथ घेताना विद्यार्थी. (छायाचित्र ः केशव मते)
-------
हा फोटो दोघांचा वरील फोटोला जोडणे
NSK26H33740
कालिदास कलामंदिर : विद्यार्थ्यांना व्यसनमुक्त जीवनाची सामुहिक शपथ देताना राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, शेजारी पालकमंत्री गिरीश महाजन.
----------
हा फोटो मजकुरात २ कॉ.
NSK26H33793
नाशिक ः राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते सन्मान स्वीकारताना मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे. शेजारी ॲड. महेश सावंत, पालकमंत्री गिरीश महाजन, न्यायाधीश मदन गोसावी.
--------------
अंमली पदार्थांना नको म्हणा, क्रीडागुण जोपासा
राज्यपाल जिष्णू देव वर्मा ः मविप्र- एसजेजे ॲनालिटिकलतर्फे ‘नो ड्रग्ज’ अभियानाचे उद्घाटन
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता.२८ ः शिक्षण म्हणजे केवळ पदवी मिळविण्याचे साधन नाही. शिक्षणातून चारित्र्य घडविले जाते, आयुष्यात ध्येय प्राप्तीसाठी लक्ष केंद्रित करणे गरजेचे असते. याउलट व्यसनाधिनतेमुळे जीवनात अस्थिरता येते. म्हणून अंमली पदार्थांना नको म्हणा आणि व्यायाम, क्रीडागुणांचा अवलंब करत जीवनात शिस्त, खिळाडूवृत्ती, मित्रभावना जोपासा, असे आवाहन राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी बुधवारी (ता.२८) विद्यार्थ्यांना केले.
मराठा विद्या प्रसारक समाज संस्था आणि एस. जे. जे. ॲनालिटिकल लॅबोरेटरी यांच्यातर्फे महाकवि कालिदास कलामंदिर येथे आयेाजित ‘सशक्त युवा, सशक्त भारत’ अभियानांतर्गत ‘नो ड्रग्ज’ या सामाजिक उपक्रमाप्रसंगी ते बोलत होते. भरगच्च सभागृहात उपस्थित विद्यार्थ्यांसह ऑनलाइन पद्धतीने जोडलेल्या गेलेल्या हजारो विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्त जीवनाची सामूहिक शपथ घेतली. पालकमंत्री गिरीष महाजन, न्यायाधीश मदन गोसावी, दिलीप घुमरे, राजभवनातील अधिकारी प्रशांत नाटनवरे, मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, ॲड. महेश सावंत आदी उपस्थित होते.
राज्यपाल वर्मा म्हणाले, सर्वात प्राचीन संस्कृती भारताची राहिली असून, आज ६५ टक्के लोकसंख्या वयाच्या पस्तीशीच्या आतील असल्याने सर्वाधिक युवा देश बनला आहे. ऐतिहासिक दृष्टीने महत्त्वाच्या टप्यावरुन देशाची वाटचाल सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी युवक वर्गाच्या उर्जेला योग्य दिशा देणे गरजेचे आहे. स्वतः व्यसनमुक्त राहात युवकांनी मित्र, कुटुंबीय, नातेवाईकांना व्यासनापासून दूर राहाण्याचा आग्रह धरावा. अंमली पदार्थांच्या संशयास्पद हालचालींविषयी पोलिस यंत्रणेकडे तक्रार करण्याचे आवाहन त्यांनी केले.
प्रास्ताविकात ॲड. सावंत म्हणाले, हा केवळ अभियानाचा प्रारंभ नव्हे, तर काळाची गरज आहे. क्षणिक सुखासाठी युवक व्यसनाच्या आहारी जात असून, त्यांच्यामध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी उपक्रम महत्त्वाचा ठरेल. कार्यक्रमात पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, आशियाई स्पर्धेत पदक विजेता दिलीप गावित व प्रशिक्षक वैजनाथ काळे, ॲड. जयंत जायभावे, निशिगंधा मोगल, श्री. मोगल, डॉ. हिरालाल पवार, सीए मिलिंद जोशी, शिवम यादव यांच्यासह पोलिस श्वानपथकातील ‘जॅक’चा सत्कार केला. मान्यवरांचे स्वागत मविप्र उपाध्यक्ष विश्वास मोरे, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, संचालक ॲड. संदीप गुळवे यांनी केले. माजी आमदार जयंत जाधव यांनी आभार मानले.
---
इन्फोः
२०-२
१ लाख ३८ हजार विद्यार्थ्यांची नोंदणी
ॲड. नितीन ठाकरे म्हणाले, की सभागृहात सर्व अभ्यासक्रमांचे विद्यार्थी उपस्थित असून, ऑनलाइन माध्यमातूनही जिल्हाभरातील विद्यार्थ्यांनी उपक्रमात सहभाग घेतला आहे. संस्थेने विकसित केलेल्या संकेतस्थळावर १ लाख ३८ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचे त्यांनी नमूद केले.
----
१६-१
युवकांनो, व्यसनमुक्त राहा
मर्यादित क्षेत्रफळ व लोकसंख्या असलेल्या इस्त्राईसारख्या देशाने जागतिक पातळीवर लौकिक मिळविला आहे. कारण तेथील सर्वच लोक राष्ट्रप्रेमाने भारावलेले आहेत. स्वतंत्र भारताला शंभर वर्षे पूर्ण होताना विकसित राष्ट्र निर्माण करण्याचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहिले आहे. देशाला मोठे होताना आजची युवापिढी पाहणार आहे. विकसित भारत घडवायचा असेल, तर युवकांनी व्यसनमुक्त राहावे. नियमित व्यायाम करत मानसिक व शारीरिक स्वास्थ्य जपावे, असा सल्ला मंत्री गिरीष महाजन यांनी दिला.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.