Wine Sakal
नाशिक

अपप्रचार नको, वाइन उद्योगाला द्या प्रोत्‍साहन

होळकर : वाइन उत्‍पादक, द्राक्षबागायतदार संघटनेची भूमिका

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : राज्‍यात २०१३ पासूनच ‘शेल्फ इन शॉप’ या प्रकारातून मॉल्‍समध्ये वाइन विक्री सुरू होती. आता केवळ एक हजार स्‍क्‍वेअर फुटांच्‍या मॉलची अट समाविष्ट केलेली आहे. पाच राज्‍यांत स्‍थानिक फळांपासून वाइननिर्मिती होऊ लागल्‍याने स्‍थानिक शेतकऱ्यांना शाश्‍वत उत्‍पन्न मिळत आहे. त्‍यामुळे राजकारण न करता वाइनबाबत अपप्रचार तातडीने थांबावा व वाइन उद्योगाला प्रोत्‍साहन मिळावे, अशी भूमिका अखिल भारतीय वाइन उत्पादक संघटनेचे अध्यक्ष जगदीश होळकर यांनी पत्रकार परिषदेत मांडली.

भाजप शासित राज्‍ये अनुकूल

महाराष्ट्राच्‍या निर्णयानंतर कर्नाटकमधील मंत्र्यांनी अभ्यासगट नेमला असून, ही समिती लवकरच महाराष्ट्रास भेट देणार आहे. या दौऱ्यात ते राज्‍य शासनाच्‍या धोरणाचा अभ्यास करणार आहेत. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश अशी भाजपशासित राज्‍ये वाइन उद्योगाला प्रोत्‍साहन देण्यासाठी अनुकूल आहेत. महाराष्ट्रात होणारे राजकारण मात्र दुर्दैवी असल्‍याचे होळकर यांनी नमूद केले. परदेशातील वायनरी आयात शुल्‍क कमी करण्यास आग्रही असून, अशात स्‍थानिक वाइन उत्‍पादकांना प्रोत्‍साहन देणे अधिक महत्त्वाचे असल्‍याचेही त्‍यांनी सांगितले. द्राक्ष उत्‍पादक बागायतदार संघाचे कैलास भोसले म्‍हणाले, की राज्‍य शासनाच्‍या निर्णयाचे स्‍वागत आहे. राजकीय व्‍यक्‍तींनी विरोध करण्याआधी द्राक्ष उत्‍पादकांना भेटून सत्‍य परिस्‍थिती जाणून घ्यायला हवी. राजकारणासाठी भरपूर मुद्दे असून, या मुद्द्यांवर राजकारण करू नये. प्रोत्‍साहनातून हजारो वायनरी उभ्या राहिल्‍या पाहिजेत. या वेळी किरण चव्‍हाण, सदाशिव नाठे, विजय घुमरे यांनीही मनोगत व्‍यक्‍त केले.

मागेल त्‍याला वाइन शॉप मिळावे : भामरे

वाइन उत्‍पादक महेंद्र भामरे म्‍हणाले, की राज्‍य शासनाच्‍या निर्णयाचा बाऊ करायला नको. मद्य विक्री दुकानांना लिकर शॉप असे नाव द्यावे, तर मागेल त्‍याला वाइन शॉप देत वाइन उद्योगाला प्रोत्‍साहन देण्याची आवश्‍यकता आहे.

केवळ सहाशे मॉल ठरतायत पात्र : रॉड्रिक्स

राज्‍य शासनाच्‍या सध्याच्‍या धोरणानुसार राज्‍यातील केवळ सहाशे शॉपिंग मॉल वाइन विक्रीसाठी पात्र ठरणार असल्‍याची माहिती अश्‍विन रॉड्रिक्‍स यांनी दिली. त्यामुळे किराणा दुकान, स्‍वस्‍त धान्‍य दुकानातून आता वाइन विक्री होईल, असा अपप्रचार थांबवायला हवा. बिअर व लिकरच्‍या तुलनेत वाइन विक्रीतून शेतकऱ्यांना सर्वाधिक उत्‍पन्न मिळत असल्‍याचे त्‍यांनी नमूद केले.

दारू निर्माण करणारेच वाइनला विरोधासाठी आघाडीवर : भुजबळ

वाइन म्हणजे दारू नव्हे, त्यामुळे वाइनला विरोध करण्याची गरज नाही. प्रत्येक निर्णयाला सुरवातीला विरोध हा होतोच; पण किराणा दुकानात वाइन विक्रीला विरोध करणाऱ्यांत कारखान्यात दारू गाळणाऱ्यांपैकीच काही जण आघाडीवर आहेत. अशी टीका पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केली.

राज्य शासनाने किराणा मॉलमध्ये वाइन विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्याविरोधात टीका होत असल्याने त्याविषयी भुजबळ यांनी टीकाकारांचा समाचार घेतला. ते म्हणाले, की वाइन हे हेल्‍दी पेय आहे. वाइन कल्चर वाढवावे, यासाठी राज्य शासनाने हा निर्णय घेतला आहे. त्यामागे शेतकरी, अर्थकारण आणि आरोग्यदायी पेय मिळावे, अशी भूमिका आहे. त्यामुळे वाइन विक्रीला विरोध करण्याची गरज नाही. वाइनला विरोध करणारे ते दारू गाळणारे कोण? याविषयी विचारले असता, मी हिंट दिली. पत्रकारांनी शोधपत्रकारिता करावी. असा सावध पवित्रा घेताना त्यांनी विरोधकांचे नाव घेण्याचे टाळले.

दहावीच्या परीक्षा ऑनलाइन घेण्याविषयी भुजबळ म्हणाले, की जे ऑनलाइन शिकले, तेच ऑफलाइन पेपरमध्ये लिहायचे आहे. त्यात चुकीचे काय आहे. तसेच, वीजबिलाविरोधात नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलने सुरू आहेत. त्याबाबतही त्यांनी वीज वितरण कंपनीवर ५५ ते ६० हजार कोटींचे कर्ज असून, कंपनी वाचविण्यासाठी वीजबिल भरणे गरजेचे असल्याचे सांगून कंपनीने ३३ टक्के सवलत दिली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT