Due to the narrowness of the Smart Road, there has been a rush of commuters.
Due to the narrowness of the Smart Road, there has been a rush of commuters. esakal
नाशिक

Nashik : Smart Road व्यावसायिकांच्या पथ्यावर; रस्त्यावर दुकाने थाटून अतिक्रमण

सकाळ वृत्तसेवा

जुने नाशिक : धुमाळ पॉइंट ते नेहरू चौक स्मार्ट रस्ता नागरिकांच्या सोयीसाठी तयार केला आहे की, व्यवसायिकांच्या सोयीसाठी, असे प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होत आहे. या भागातील विविध व्यावसायिकांनी त्यांच्या दुकानांपुढे मोठ्या प्रमाणावर कपडे, तसेच दुकानातील विक्रीसाठी असलेल्या वस्तू लावून ठेवल्या आहेत. (Encroachment on Smart Road by setting up shops on road Nashik Latest Marathi News)

महापालिका अतिक्रमण विभागाच्या कृपेमुळे सांगली बँक सिग्नल ते धुमाळ पॉइंट, दहिपूल परिसर तसेच नेहरू चौकापर्यंतचा स्मार्ट रोड व्यावसायिकांच्या अतिक्रमणाने वेढला गेला आहे. त्यात स्मार्टसिटी विभागाचे नियोजन शून्य कामामुळे नेहमी विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. याशिवाय विक्रेते, व्यवसायिकांकडून स्मार्ट रोडवर स्वतःचे दुकान सोडून दुकानासमोरील स्मार्ट रोडवर कपडे अडकवून ठेवले आहे. दुकानात येणाऱ्या ग्राहक त्यापलीकडे त्यांचे वाहन पार्क करत असतात. त्यामुळे रस्ता अरुंद होत असतो.

पायी ये- जा करणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. स्मार्ट रोडला गल्लीचे स्वरूप येते. त्यात या मार्गावरून रहदारी असल्याने अरुंद रस्त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. चौकात वाहतूक कोंडी झाल्याने अन्य मार्गावरदेखील लांबच लांब वाहनांच्या रांगा दिसून येतात. नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतो. शिवाय अन्य व्यावसायिकांच्या व्यवसायावर याचा परिणाम होत असतो. या भागात खरेदीसाठी येणारे नागरिक वाहतूक कोंडीपासून बचाव करण्यासाठी अन्य ठिकाणी खरेदीस पसंती दर्शवितात.

अशा विविध समस्या स्मार्ट रोडवरील अतिक्रमणामुळे निर्माण झाल्या आहेत. महापालिका अतिक्रमण विभागाकडून स्मार्ट रोडला स्मार्ट स्वरूप प्राप्त करून देण्यासाठी येथील अतिक्रमण काढणे आवश्यक आहे. केवळ एक दिवस या ठिकाणी मोहीम राबवून उपयोग नाही तर पूर्णपणे अतिक्रमणाचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत अतिक्रमण मोहीम राबविण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

"स्मार्ट रोड, स्मार्ट नाही तर स्मार्ट गल्ली असल्यासारखी परिस्थिती सांगली बँक सिग्नल ते दहीपूलपर्यंत जाणवते. स्मार्टसिटी विभागाच्या नियोजन शून्य काम व अतिक्रमणामुळे स्मार्ट रोड अतिशय अरुंद झाला आहे. महापालिकेकडून येथील अतिक्रमणांवर कारवाई करावी."

- श्याम जगताप, नागरिक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs KKR Live Score: केएल राहुलने जिंकला टॉस, लखनौ संघात मोठा बदल; जाणून घ्या दोन्ही संघांची प्लेइंग-11

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

IPL 2024 Point Table : ऋतुराजची चेन्नई टॉप फोरमध्ये दाखल! CSK च्या विजयानं पंजाबलाच नाही तर तब्बल सहा संघांना बसला धक्का

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

SCROLL FOR NEXT