encroachment removal esakal
नाशिक

Nashik News: त्रंबकेश्वर येथे श्रावण महिन्यात गर्दीमुळे पालिकेच्या वतीने अतिक्रमण हटाव मोहीम

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : सततचा चर्चेचा विषय म्हणजे त्रंबकेश्वर येथे भर रस्त्यात व्यावसायिक दुकाने थाटली बसल्याने पादचारी व वाहनांना जागाच शिल्लक नसते.

रोजची भाविकांची गर्दी व मोठी अनास्था हे त्रंबकेश्वर नगरीचे समिकरण ठरलेले आहे. (Encroachment removal campaign on behalf of Municipality due to crowding in Shravan month in Trambakeshwar Nashik News)

ह्या पुर्वी शिकाऊ उपजिल्हाधिकारी यांनी त्रंबकेश्वर नगरीतील भर रस्त्यातील अतिक्रमणे व दुकाने व घरांच्या छपऱ्या पालिकेच्या माध्यमातून आज सकाळी काढुन घ्यावेत व रस्त्यातील व्यवसाये हटविण्यात यावे, अशी जाहिर सुचना ध्वनिक्षेपकावरुन रिक्षाद्वारे शहरात देण्यात आली. त्यानंतर दुर्लक्ष करणाऱ्यांचे प्रथम अतिक्रमणे हटाव मोहीम सुरू करण्यात आली.

यात नगरपालिकेच्या प्रशासक श्रेया देवचके, बांधकाम विभागाचे विजय सोनार, अभियंता ईनामदार, स्वच्छता विभागाचे ठाकरे, मुख्यलिपिक संजय मिसर व अतिक्रमण विभागाचे कर्मचारी यांनी ही मोहीम राबविली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

यात जेसीबी मशीनद्वारे रोडवरील छपर्या तोडण्यात आल्या. भर रस्त्यात दुकाने झालेल्या व्यावसायीकांची आज पळापळ झाली. अनेकांनी स्वत:होउन छपर्या व रस्त्यात असलेले सामान काढुन घेतले.

तर अनेकांनी ते न काढल्याने पालिकेने ते तोडुन टाकल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले. अधिक श्रावण हा महिना फारमोठया प्रमाणात गर्दीचा होता व त्यावेळी भाविकांचे अतोनात हाल झाले.

त्याची पुनरावृत्ती नको म्हणून का होईना उशीरा पालिकेने सुरु केलेली मोहीम निश्चित स्वरुपात राहिल्यास नगरीचा बकालपणा थांबविण्यासाठी कार्य होईल अथवा नेहमीचाच प्रश्न तसाच राहील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: पंजाब किंग्सचा सलग चौथा पराभव; दिल्ली कॅपिटल्सने Playoff चे गणित बिघडवले; CSK, KKR, RR ला संधी...

Big News: राहुल द्रविड बनला ट्वेंटी-२० संघाचा मालक; भारताशिवाय 'ज्या' देशाकडून खेळलेला, तिथेच युवा टॅलेंट शोधण्यासाठी परतला...

Operation Clean: अवैध मद्यनिर्मितीविरोधात महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! राज्यभर ‘ऑपरेशन क्लीन’ सुरू; कायदा आणखी कडक

Iran Peace Proposal: मिडल ईस्टमध्ये शांततेची शेवटची आशा संपली? अमेरिकेने इराणचा प्रस्ताव फेटाळला; तेलाच्या किंमतीत वाढ

Mumbai Local: मुंबई लोकल वाहतूक विस्कळीत, काही फेऱ्या रद्द; अनेक गाड्या २० मिनिटांपर्यंत उशिराने

SCROLL FOR NEXT